सिंधुदुर्ग today



नांदगाव व तोंडवली परीसरात अतिवृष्टीमुळे घरांवर झाडांची पडझड 

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव व तोंडवली परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेच्या कडकडाटासह परतीचा धुवांधार पाऊस पडल्याने झाड घरावर व घरातील अंगणात कोसळून नुकसान झाले आहे.

         नांदगाव वाशिनवाडी येथे गंगाराम साळुंखे यांच्या घरावर सागाच्या झाडाची भली मोठी फांदी पडल्याने मोठं नुकसान झालं आहे तसेच तोंडवली बोभाटेवाडी येथे श्री.नाना पांडुरंग बोभाटे यांचे राहत्या घराच्या समोरील अंगणाचे  मांडवावरील सिमेंटचे पत्र्यावर वादळ व अतिवृष्टीमुळे गुलमोहराचे झाडं पडून नुकसान झाले आहे. यामुळे परतीच्या वाटेवर असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही झाडे विद्युत लाईन वर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today