सिंधुदुर्ग today
कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नांदगाव हायस्कूलचे घवघवीत यश.
कणकवली ( ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल ने घवघवीत यश संपादन केले आहे.
क्रीडा शिक्षक श्री संजय सावंत यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. या यशस्वी वाटचालीस संस्था अध्यक्ष श्री नागेश मोरये, उपाध्यक्ष श्री अंकुश डामरे ,खजिनदार श्री सुभाष बिडये, सचिव कृष्णा म्हसकर, संस्था सदस्य श्रीधर उर्फ दाजी मोरये यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे .
स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थी जिल्हास्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत.
नेहा कदम 100 मिटर धावणे प्रथम तर लांब उडी मध्ये व्दितीय, श्रावणी बिडये लांब उडी प्रथम व तिहेरी उडी प्रथम ,निकिता भडाचे गोळा फेक व्दितीय, आर्यन मोरये लांब उडी प्रथम, नितेश राणे 3000 हजार मिटर धावणे तृतीय क्रमांक , अपूर्वा अवधूत वाळके लांब उडी प्रथम, व 200 मिटर धावणे द्वितीय आणि 100 मिटर धावणे तृतीय , अन्सार नावळेकर 100 मिटर धावणे तृतीय, सुप्रिया माने 600 मिटर धावणे तृतीय या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.यशस्वी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा