सिंधुदुर्ग today

 


शिक्षिका मुमताज बेगम सफरअली इसफ यांना शैक्षणिक पुरस्कार.

विविध मान्यवरांच्या उपस्थित सोलापूर येथे पुरस्काराने गौरव.


कणकवली/ऋषिकेश मोरजकर

       तिथवली (वैभववाडी) येथील रहिवाशी आणि प्राथ.उर्दू शाळा खारेपाटण - बंदरवाडी तसेच जि. प.प्राथ. उर्दू शाळा  उंबर्डे मेहबूबनगर मधील पूर्व शिक्षिका व सद्या सोलापूर माढा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मुमताज बेगम सफरअली इसफ यांचा शैक्षणिक पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुमताज बेगम सफरअली इसफ यांना आजादी बचाव हिंदी पत्रिकेतर्फे सदर पुरस्कार सोलापूर येथे एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

     श्रीम. मुमताज या तिथवली गावच्या असून सिंधुदुर्गातील प्रतिभावंत कवी सफरअली इसफ यांच्या त्या पत्नी आहेत. मुमताज बेगम सफरअली इसफ यांनी शालेय मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

    मुमताज बेगम सफरअली इसफ या सोलापूर जिल्ह्यातील जि. प. उर्दू माढा शाळेत सद्या शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी शाळेच्या भौतिक, शैक्षणिक, सोयीसुविधेकडे प्रामुख्याने लक्ष दिले. शाळेच्या पटसंख्या वाढीसाठी विशेष काळजी घेतल्याने प्रामुख्याने पटसंख्या गळती थांबली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचवावा म्हणून शाळेत वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविण्यास मेहनत घेतली. परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दानशूर लोकांमार्फत शैक्षणिक उठवातून शाळेसाठी वस्तू स्वरूपात मदत आणण्यात त्या अग्रेसर राहिल्या.

    अशा प्रकारे शाळेच्या प्रती असणारी निष्ठा व मेहनत पाहून यावर्षीचा आजादी बचाव आदर्श शिक्षक पुरस्कार मुमताज बेगम सफरअली इसफ यांना सोलापूर हुतात्मा मंदिर सभागृहात सोलापूरच्या पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सरकारी वकील प्रदिपसिंह रजपूत, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ पत्रकार हाजी अजीज पटेल, हाजी सलीम लोखंडवाला, अफजल अडते, आकीब मडकी, महम्मद आसिम पटेल, मराठा संघाचे दास साळुंखे आदीच्या उपस्थितीत सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today