सिंधुदुर्ग today
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 गड किल्ले मध्ये नांदगाव किल्ल्याचीही शासन दप्तरी नोंद.
नांदगाव गड किल्ल्यातील माती मालवण किल्ला येथे उद्या नेण्यात येणार.
जिल्हा परिषद कडून आलेल्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायत कडून पूर्व तयारी.
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन दप्तरी 38 गड किल्ले मध्ये कणकवली तालुक्यातील नांदगाव किल्ल्याचाही समावेश आहे . कणकवली तालुक्यात नांदगाव व खारेपाटण या गावात किल्ला म्हणून नोंद आहे. नांदगाव कोटाचा माळ म्हणून सुपरिचित असलेल्या ठीकाणी ही नोंद असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा परिषद कडून या 38 किल्ल्यातील माती गोळा करून ती एकत्रित मालवण किल्ला येथे उद्या दिनांक 1 नोव्हेंबर रोजी नेण्यात येणार आहे. म्हणून आज जिल्हा परिषद कडून आलेल्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायत कडून पूर्व तयारी करून पुरोहित यांच्या हस्ते विधीवत पुजा माती गोळा करण्यात आली आहे .
नांदगाव ग्रामपंचायत नजीक कोटाचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे.शासन दरबारी त्याची नांदगाव किल्ला अशी नोंद आहे. त्याचा पूर्व इतिहास पाहता जुने जाणते जाणकार लोक तिथे पागेचा माळ नावाचे सुद्धा एक ठिकाण आहे असे सांगतात आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी घोडे बांधायची जागा होती ते घोडे राजापूर या ठिकाणाहून येत असत आणि या कोटाचा माळ या ठिकाणी थांबत असत त्यानंतर ते सावंतवाडीला जात असत अशी जाणकारांकडून माहिती मिळाली कोटाचा माळ या ठिकाणी किल्ले सदृश्य खंदक वगैरे आढळले आहेत आणि शासन दरबारी त्याची नोंद आहे उद्या दिनांक एक नोव्हेंबर 2023 रोजी या किल्ल्याच्या ठिकाणची माती कलशांमध्ये भरून कणकवली पंचायत समिती येथे नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर कणकवली तालुक्यामधून इतर तीन ठिकाणाहून किल्ल्यावरून असेच कलश येणार आहेत आणि या चारही ठिकाणचे कलश घेऊन मालवण किल्ला येथे जाणार आहेत.
माती गोळा करतेवेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, पुरोहित शरद गगनग्रास, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा