सिंधुदुर्ग today



आयनल नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ ला परवानगी

कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या दोन्ही गटांना बंदी आदेशाला जिल्हा न्यायालयाकडून स्थगिती.

प्रतिनिधी |कणकवली

आयनल येथील श्री देवी पावणाई मंदिरातील नवरात्रोत्सवाबाबत येथील कार्यकारी दंडाधिकारी यांनी दोन्ही गटांना लागू केलेल्या बंदी आदेशाला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पार्टी नं. १ चे गंगाराम साटम गटाला उत्सव साजरा करण्याची परवानगी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ सानिका जोशी यांनी दिली आहे. गंगाराम साटम यांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई, अॅड. उमेश सावंत, अॅड. सुहास साटम यांनी काम पाहिले.

१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या आयनल येथील श्री देवी पावणाईच्या नवरात्रोत्सवाबाबत पार्टी नं. १ गंगाराम साटम वगैरे ३ व पार्टी नं. २ चे गजानन साटम वगैरे ५ यांच्यात मानपानावरून वाद आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांनी कार्यकारी दंडाधिकारी यांना दोन्ही गटांना बंदी लावण्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यान पार्टी नं. १ यांच्यातील प्रवीण साटम यांनी स्वतंत्र भूमिका घेत पार्टी नं. १ ला विरोध केला होता. कलम १४४ च्या सुनावणीत कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर तीनही पार्टीनी युक्तीवाद सादर केला. तथापी पोलीस अहवालानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी उत्सव साजरा करण्यास बंदी आदेश लागू केला होता.

याविरुद्ध पार्टी नं. १ चे गंगाराम साटम वगैरे ३ यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्रिक्षण अर्ज दाखल केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत यापूर्वी सदर देवस्थानासंदर्भात पार्टी नं. १ यांच्या बाजूने झालेले आदेश व शांततेत पार पडलेले कार्यक्रम, जिल्हा न्यायालयाचा दिवाणी अपिलातील आदेश, बंदी आदेशातील त्रृटी आदी बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उत्सवाचा कालावधी, पार्टी नं. १ यांचे हक्क, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तातडीने आदेश देणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष काढत कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली.

सदरचा उत्सव पार्टी नं. १ ने शांततेत साजरा करावा, अन्य गट सामील झाल्यास त्यांना सामील करून घेण्यात यावे, असे आदेश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today