सिंधुदुर्ग today
नांदगाव होम मिनिस्टर कार्यक्रमाला महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
अनिता बांदेकर ठरल्या होम मिनिस्टर मानकरी
स्वप्नाली मोरजकर व्दितीय तर अस्मिता मोरये तृतीय
कणकवली | प्रतिनिधी
श्री देव रवळनाथ, पूर्वाईदेवी, दिर्बाईदेवी ,मूळ आकार ,श्री गणेश मंदिर,भूमी आकार नवरात्र उत्सव समिती नांदगाव च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आज कोण जिंकणार पैठणी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात प्रथम पैठणी मानकरी ठरली आहे अनिता अनिल बांदेकर, उपविजेते स्वप्नाली सुरेश मोरजकर , तृतीय क्रमांक अस्मिता शामसुंदर मोरये यांना आकर्षक पैठणी साडी देण्यात आली आहे. तर सर्व सहभागी स्पर्धकांना साडी गिफ्ट देऊन गौरविण्यात आले आहे.पैठणी साडी व सर्व साड्या आदर्श ऊर्फ भाऊ मोरजकर यांनी पुरस्कृत केले होते.
यावेळी चंद्रकांत मोरये, शामसुंदर बिडये, संतोष मोरये, शामसुंदर मोरजकर, विलास मोरजकर , विठ्ठल बिडये आदी बहुसंख्येने उपस्थित होते. या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
हो मिनिस्टर कार्यक्रम सुत्रसंचलन ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा