सिंधुदुर्ग today
पहिल्या साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे संगीत अभ्यासक माधव गावकर 4 जानेवारी रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृहात संमेलनाचे आयोजन संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती कणकवली/प्रतिनिधी सिंधुदुर्ग साहित्य-संगीत मित्र मंडळातर्फे शनिवार 4 जानेवारी रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृह कणकवली येथे एक दिवशीय साहित्य - संगीत संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी आणि चित्रपट गीतकार अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत अभ्यास माधव गावकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली. एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते. साहित्य आणि संगीत यांचं नातं या अर्थाने अधिक जवळच आहे. या पार्श्वभूमीवर सदर साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संगीत मैफल, पुरस्कार वितरण, साहित्य - संगीत याविषयी मार्गदर्शन आणि न...