सिंधुदुर्ग today

 


नांदगाव केंद्रस्तरीय शालेय क्रीडा महोत्सवासाठी जि.प. कोळोशी -हडपिड शाळा सज्ज. 

 कणकवली प्रतिनिधी 

 नांदगाव केंद्रस्तरीय शालेय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४ यावर्षी जि.प. शाळा कोळोशी -हडपिडच्या भव्य क्रिडांगणावर रंगणार असून यासाठी कोळोशी -हडपिड शाळा व क्रिडांगण सज्ज होत आहे.या महोत्सवाची सुरुवात १२ डिसेंबर रोजी होत आहे.

         शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ ते १३ डिसेंबर २०२४ असा दोन दिवस हा महोत्सव कणकवली तालुक्यातील जि.प.शाळा कोळोशी -हडपिड येथे रंगणार आहे.या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, आयनल सरपंच सिध्दि दहिबावकर, शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई अध्यक्ष श्रीकांत इंदप, शाळा समिती माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड अध्यक्ष किशोर राणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भूमिका उरणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव केंद्रातील सर्व गावचे उपसरपंच, शाळांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष , पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.तरी जास्तीत जास्त ग्रामस्थ, पालक व क्रिडाप्रेमींनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन नांदगाव केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, केंद्रस्तर क्रीडा प्रमुख संतोष देसाई,उपक्रिडा प्रमुख बाळकृष्ण सावंत, नांदगाव केंद्रशाळा मुख्याध्यापक सुहास सावंत कोळोशी -हडपिड मुख्याध्यापक विशाखा तांबे, यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today