सिंधुदुर्ग today



राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने

कोरोना बाधित रुग्णाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश.

  कणकवली प्रतिनिधी 

  कोविड १९ ची बाधा झाल्यास आवश्यक पुरावे दिल्यानंतर पेशंटला विमा पॉलिसीची रक्कम मिळणार अशी विशेष पॉलिसी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सन 2019 -20 च्या दरम्याने जाहीर केली होती. कोविड कालावधीत प्रत्येक व्यक्तीच्या मनात आजारपणाचे भय होते त्यामुळे अनेकांनी ही पॉलिसी खरेदी केली होती.

      सावंतवाडी येथील एका रुग्णाने एक लाख रुपयांची जोखीम स्वीकारणारी ही पॉलिसी कंपनीकडून खरेदी केली होती पॉलिसी खरेदीनंतर काही महिन्यातच त्याला कोविड १९ ची बाधा झाल्याने सावंतवाडी येथील सरकारी रुग्णालयात त्याला ऍडमिट व्हावे लागले होते. त्याबाबतचे ऍडमिट -डिस्चार्ज कार्ड इत्यादी कागदपत्र रुग्णाने ईमेल द्वारा मुदतीत कंपनीला पाठवले होते. परंतु कंपनीने तांत्रिक कारणाने पॉलिसी रक्कम देण्याचे नाकारले होते.

         त्यानंतर त्या रुग्णांने एडवोकेट दीपक अंधारी यांचे मार्फत कंपनीला नोटीस देऊन पॉलिसी रकमेची मागणी केली .*परंतु त्या नोटीसीला कंपनीने कोणतेही उत्तर न दिल्याने कंपनी विरुद्ध सिंधुदुर्ग ओरस येथील ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे एडवोकेट दीपक अंधारी यांचे मार्फत रीतसर  तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीबाबत गुणदोषावर कामकाज चालून  त्या रुग्णास (तक्रारदारास) विमा पॉलिसीची रक्कम रुपये १,००,०००/-,सदर रकमेवर दसादशे नऊ टक्के दराने व्याज, तसेच खर्चाची रक्कम,मनस्ताबाबत नुकसान भरपाई,मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळून रुपये ३६०००/- असे एकूण एक लाख छत्तीस हजार रुपये  विमा कंपनी ने तक्रारदारास देण्याबाबत आदेश करण्यात आले आहेत.

          प्रस्तुत आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती इंदुमती मलूस्टे व सदस्य श्री योगेश खाडीलकर यांनी केले आहेत.अशा प्रकारच्या आदेशामुळे कंपनीच्या चुकीच्या धोरणाला आळा बसणार आहे. तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केल्याने ग्राहकाला कमी वेळेत कमी खर्चात जलद न्याय मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे ग्राहक- तक्रारदार कडून समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today