सिंधुदुर्ग today
मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर मोरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर.
कणकवली प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे हे दिनांक २९/१२/२०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून सकाळी १०.३० वाजता देवगड येथून दौऱ्याची सुरुवात तर सायंकाळी ७.३० वाजता कणकवली येथे दौऱ्याचा शेवट असणार आहे.
दौऱ्यात सर्व मनसे आणि मनविसे आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी घेऊन जिल्ह्यात मनसे विद्यार्थी सेनेचे संघटन आणखी जोमाने वाढविण्यासाठी या दौऱ्यात मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा