सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम
मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील ओम श्री दत्तगुरु न्यास रजि. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा नांदगाव दत्त मंदिर पाटील वाडी येथे दत्त जयंती निमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यानिमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे बुधवार दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी पुण्या हवाचन, गणेश पूजन इत्यादी पूजा विधि देवताजलाधिवास ,देवताशय्याधिवास , देवता धान्यधिवास. गुरुवार १२ डिसेंबर रोजी वास्तुयज्ञम् ग्रहयज्ञम् इ.पुजा विधी सकाळी ११.२५ वा.श्री गुरु दत्तात्रेय मूर्ती प्राणप्रतिष्ठा षोडशोपचार पूजा पूर्णाहुती, नैवेद्य आणि महाआरती, दुपारी १ वा.महाप्रसाद सायंकाळी ७.३० वा. सुस्वर भजन, रात्री ९.३० वा. दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचे दशावतारी नाटक, शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ३ ते ६ निशान रात्रौ ९ वा.महिला व लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव २०२४ सकाळी अभिषेक पुजा विधी, नैवेद्य, महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद सायंकाळी ४ वा. किर्तन दत्त जन्मोत्सव, रात्री ९ वा. भजन , पालखी सोहळा रात्री १२ वा. दशावतारी नाटक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा