सिंधुदुर्ग today
नांदगाव केंद्रस्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे कोळोशी येथे शानदार उद्घाटन.
१८ ,१९ डिसेंबर ला कोळोशी येथेच होणार प्रभाग स्तरीय क्रिडा महोत्सव
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव केंद्रस्तरीय शालेय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४ जि.प. शाळा कोळोशी -हडपिडच्या भव्य क्रिडांगणावर शानदार उद्घाटन आज संपन्न झाले आहे .
शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ ते १३ डिसेंबर २०२४ असा दोन दिवस हा महोत्सव कणकवली तालुक्यातील जि.प.शाळा कोळोशी -हडपिड येथे रंगणार आहे.या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, माजी जिल्हा परिषद चे बांधकाम सभापती नागेश मोरये, शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई अध्यक्ष श्रीकांत इंदप, हडिपिड सरपंच संध्या राणे, कोळोशी उपसरपंच अतुल गुरव , विद्याधर खोत, माजी सरपंच सुशिल इंदप, संतोष चव्हाण, सिद्धार्थ तांबे,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत, क्रिडा महोत्सव प्रमुख संतोष देसाई, कोळोशी हडपिड शाळा मुख्याध्यापिका तांबे,शाळा समिती माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड अध्यक्ष किशोर राणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भूमिका उरणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव केंद्रातील सर्व गावचे उपसरपंच, शाळांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
१८डिसेंबर १९ डिसेंबर ला कोळोशी येथेच प्रभाग स्तरीय क्रिडा महोत्सव सुध्दा होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा