सिंधुदुर्ग today
स्वागताची जय्यत तयारी सुरू ; स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री श्री नितेश राणे हे उद्या रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
खारेपाटण पासून ते देवगड नांदगाव ते अगदी बांद्यापर्यंत जागोजागी जंगी स्वागत केले जाणार आहे.
नांदगाव पंचक्रोशीतील भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदगाव तिठा येथे उद्या रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी ठीक १ वा. भव्य स्वागत केले जाणार आहे. नांदगाव तिठा येथे स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
नांदगाव तिठा येथील होणाऱ्या स्वागतासाठी नांदगाव पंचक्रोशीतील सर्व सरपंच, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा