सिंधुदुर्ग today
मुंबई एकता कल्चरतर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा
२८ डिसेंबर पर्यंत कविता
पाठविण्याचे आवाहन
कणकवली/प्रतिनिधी
मुंबई एकता कल्चर अकादमीतर्फे खुली राज्यस्तरीय गणपत गुणाजी जाधव स्मृती काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 28 डिसेंबर 2024 या अंतिम तारीख पर्यंत खालील दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकवर आपली एक कविता पाठवावी असे आवाहन एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले आहे.
सदर स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पंधराशे रुपये, सातशे रुपये आणि पाचशे रुपये तसेच स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवीना १५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. प्रवेश शुल्क पाठवल्यावर त्याचा स्क्रीन शॉट प्रवेश शुल्क भरण्यासाठी देण्यात आलेल्या गुगल नंबरच्या व्हाट्सअपवर पाठविणे बंधनकारक आहे. तसेच त्याच व्हाट्सअप क्रमांकला स्पर्धेला पाठविण्यात येणारी आपली एक कविता पाठवावी. कविता फार मोठी असू नये. प्रवेश शुल्कासाठी गुगल पे नंबर आणि कविता पाठविण्यासाठी व्हाट्सअप नंबर - 92208 99120 (प्रकाश जाधव)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा