सिंधुदुर्ग today
कोकणातील बिएसएनलची सेवा गतिमान करा.
१५० मंजूर ४ जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण.
खा.नारायण राणे यांची दूरसंचार मंत्र्यांकडे सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी.
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी मागणी आहे मात्र १५०मंजूर ४जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण झाले असून फक्त १० टॉवर ४ जी सेवा देत आहेत.याकडे खा.राणे यांनी मंत्र्याचे लक्ष वेधले. यावेळी बिएसएनएल सेवा कोकणात अधीक मजबुत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करु,संबधीतांना सुचना देण्यात येतील असे मंत्र्यांनी सांगीतले.
दूरसंचार मंत्री यांना खा.नारायण राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मी महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहे. सिंधुदुर्गातील जिल्ह्यात डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा समावेश आहे. या जिल्ह्यात चांगली सेवा देणारी बीएसएनएल ही एकमेव मोबाईल कंपनी आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक महसूल मिळवणारा जिल्हा आहे. मात्र, मनुष्यबळ आणि निधीअभावी सेवेत अनेक त्रुटी आहेत. मंजूर १५०-४जी टॉवरपैकी ८७ चे काम पूर्ण झाले असून फक्त १० टॉवर ४जी सेवा देत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी मागणी आहे, मात्र मनुष्यबळ आणि निधीअभावी ती पूर्ण करता येत नाही. केबल बिघाडामुळे किंवा इतर कारणांमुळे सेवा खंडित झाल्यास मनुष्यबळाच्या अभावी उपस्थित राहता येत नाही. बीएसएनएल वापरकर्त्यांनी सेवेच्या गतीबद्दल तक्रारी केल्या आहेत. केबलच्या देखभालीसाठी नेमलेला विक्रेता आपले काम व्यवस्थित करत नसल्याच्या तक्रारी आहेत. कृपया संबंधितांना सेवेत सुधारणा करण्यासाठी, बीएसएनएल सिंधुदुर्गासाठी मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात.अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा