सिंधुदुर्ग today
सरस्वती हायस्कूल नांदगाव वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.
माजी विद्यार्थ्यांचेही होणार सांस्कृतिक कार्यक्रम.
१ व २ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव पंचक्रोशी माध्य.शिक्षण संस्था नांदगाव संचलित सरस्वती हायस्कूल नांदगाव वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा १ व २ जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे संस्था चेअरमन नागेश मोरये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.
१ जानेवारी रोजी सकाळी १० वा.रांगोळी स्पर्धा अँड दिपक अंधारी पुरस्कृत अनुक्रमे तिनं विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत.दुपारी १२ ते २ स्नेह भोजन , दुपारी २ ते ३ हळदीकुंकू, सायंकाळी ३ वा. श्रीधर मनोहर मोरये पुरस्कृत होम मिनिस्टर अनुक्रमे तिनं विजेत्यांना पैठणी , सायंकाळी ६ ते रात्री ९ माजी विध्यार्त्याचे संस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
तसेच २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सुभाष बाळकृष्ण बिडये पुरस्कृत पाककला स्पर्धा अनुक्रमे तिनं विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिके दुपारी १२ ते २ स्नेह भोजन दुपारी ३ वा.सुनिल शिवराम आंबेरकर पुरस्कृत वेशभूषा स्पर्धा अनुक्रमे तिनं विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते ९ प्रशालेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम.आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सरपंच व पोलीस पाटील यांचा सत्कार तसेच दोन वर्षात ज्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला आर्थिक योगदान केले आहे त्या विद्यार्थ्यांचाही सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा