सिंधुदुर्ग today
नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच नांदगाव येथे जल्लोष
फटाक्यांची आतषबाजी व लाडू पेढे वाटून आनंदोत्सव साजरा.
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आज मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव पंचक्रोशीतील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नांदगाव येथे एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच लाडू ,पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, वंदे मातरम्, भारत माता की जय, आधी घोषणांनी नांदगाव तिठा परिसर दणाणून सोडला .
यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर भाजपा महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके,नांदगाव शक्ति केंद्र प्रमुख भाई मोरजकर ,नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर , माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, आयनल माजी सरपंच संतोष वायंगणकर, असलदे माजी सरपंच सुरेश लोके, कोळोशी माजी सरपंच सुशिल इंदप,छोटू खोत,रज्जाक बटवाले, प्रदीप हरमलकर, प्रविण डगरे ,संतोष जाधव,एच व्ही .वाळके , कमलेश पाटील, प्रशांत परब, रघुनाथ लोके, यासिन नावलेकर, अंकित लोके, दिनेश तावडे,विलास कांडर विठोबा कांदळकर,राजू तांबे,तोसिम नावलेकर,जाफर कुणकेरकर, पप्पी सापळे, श्रीराम मोरजकर, श्रीकृष्ण वायंगणकर,गंगाधर बोभाटे ,शंकर मोरये, मनिष पडवळ आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा