सिंधुदुर्ग today



कार्यकर्त्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास तुम्हाला पोलीसांना फोन करण्याची गरज पडणार नाही - नामदार. नितेश राणे 

नांदगाव तिठा येथे ना. नितेश राणे यांचे जल्लोषी स्वागत ;  मंत्री म्हणून दुप्पट परतफेड करेन 

कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) 

तुम्ही मला आमदार म्हणून निवडणूकीत तिस-यांदा साथ दिलात, त्यामुळे आता तुमचा मंत्री , भाऊ म्हणून , कुटुंबातील सदस्य म्हणून परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. मंत्री म्हणून तुम्हाला दुप्पट देण्याची तयारी आमची आहे. माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास तुम्हाला पोलीसांना फोन करण्याची गरज पडणार नाही, या पुढे या भागाच्या विकासासाठी मंत्री म्हणून तुमच्या पाठीशी मी राहिन .  मागाल त्याच्या दुप्पट देण्याची माझी तयारी असल्याचा विश्वास ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. 


नांदगाव येथे दशक्रोशीच्यावतीने मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी , विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर उपस्थित होते. यावेळी नांदगाव विभागाच्यावतीने सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके ,शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , कमलेश पाटील , भाग्यलक्ष्मी साटम , पप्पी सापळे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. नांदगाव गावाच्यावतीने नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सहकारी यांनी स्वागत केले. असलदे गावाच्यावतीने असलदे सरपंच चंद्रकांत डामरे व चेअरमन भगवान लोके यांनी स्वागत केले. कोळोशी गावाच्यावतीने सरपंच गुरुनाथ आचरेकर व उत्तम सावंत व सर्व सहकारी तर आयनल गावाच्यावतीने भालचंद्र साटम व माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, माजी सरपंच बापू फाटक, आयनल सरपंच सिध्दी दहिबांवकर , सर्व सहकारी ,  सावडाव गावच्या वतीने दत्ता काटे व सहकारी यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले. तसेच महिला तालुकाध्यक्ष  हर्षदा वाळके , भाग्यलक्ष्मी साटम व सर्व महिलांच्या वतीने स्वागत केले. नांदगाव माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, यासिन नावलेकर व माजी उपसरपंच निरज मोरये यांनी स्वागत केले.अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी स्वागत केले.

यावेळी प्रदीप हरमलकर ,रघुनाथ लोके , प्रशांत परब , पप्पी सापळे , रिक्षा संघटना नांदगाव, जाफर बटवाले, संतोष वाळके व मित्र परिवार , प्रफुल तोरस्कर , डॉ सर्वेश नारकर आदींनी शुभेच्छा दिल्या . 

यावेळी असलदे माजी सरपंच सुरेश लोके , माजी चेअरमन प्रकाश परब , सोसायटी संचालक छत्रुघ्न डामरे , परशुराम परब , उदय परब , संतोष परब , महेश लोके , शामू परब , संदेश आचरेकर ,मनोज लोके , राजा परब , मनीष पडवळ , संतोष ओटवकर , नम्रता साटम , अनिल ओटवकर , कल्पना फाटक , संगिता कुबडे , वंदना माने , अलका माने , शितल ओटवकर , मनोहर चव्हाण , रज्जाक बटवाले , जाफर बटवाले , सुरेश डामरे , संतोष चव्हाण , आफरोजा नावलेकर , बाबूजी चव्हाण , नीरज मोरये ,विलास कांडर , संतोष घाडी आदींसह नांदगाव दशक्रोशीतील भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सरपंच , उपसरपंच , बुथ अध्यक्ष , सोसायटी चेअरमन, संचालक यांनी नामदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या. 

फोटो -

नांदगाव विभागाच्या वतीने ना. नितेश राणे यांचे पुष्पहार घालून स्वागत करताना पदाधिकारी व कार्यकर्ते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today