सिंधुदुर्ग today
कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिन साजरा
विविध मान्यवरांनी पोलीस पाटील यांना दिल्या शुभेच्छा
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
पोलीस पाटील यांची प्राचीन काळापासून गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखांची महत्त्वाची भूमिका आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडविण्यातही पोलीस पाटील यांचा सहभाग असतो. इंग्रजांच्या काळातही गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख कार्य करण्याचे कार्य पाटील करत असे. ब्रिटिश काळात प्रथमतः मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 अमलात आणला गेला 17 डिसेंबर 1967 रोजी पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा करून पोलीस पाटील यांचे गाव पातळीवर निर्मिती करण्यात आली.यामुळे गावचा महत्त्वाचा घटक म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे बघितले जाते. असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
आज पोलीस पाटील दिनानिमित्त कणकवली तालुका पोलिस पाटील संघटनेकडून पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला कणकवली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मारुती जगताप, अँड .नंदन वेंगुर्लेकर, पोलीस अधिकारी श्री किरण मेथे, वनविभागाचे रेंजर, श्री भुणघेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी कणकवली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना कणकवली येथे येत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
खूपच सर्व अधिकाऱ्यांचे सत्कार महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुका कणकवलीच्या वतीने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुका कणकवली चे सर्व पदाधिकारी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा