पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत उद्या दुसरे साहित्य संगीत संमेलन साहित्य संगीत संमेलनाची रूपरेषा जाहीर ; गायन,पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन कणकवली/प्रतिनिधी       गेल्या वर्षापासून साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गतर्फे साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे दुसरे साहित्य संगीत संमेलन शनिवार 31 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. कणकवली शहरातील मराठा नाट्यगृह मध्ये आयोजित करण्यात आले असून संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपशास्त्रीय, चित्रपट आणि भावगीते गायन, साहित्य संगीत क्षेत्रातील पुरस्कार वितरण आणि निमंत्रितांचे कवी संमेलन अशा कार्यक्रमांचा समावेश असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अभ्यासक आणि संगीत संशोधक डॉ.निर्मोही फडके यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.        एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते.अनेक कलांच्या संगमातून समाजाची निकोप वाढ होत असते.मात्र असे असले तरी कला संगम संमेलने आपल्याकडे फारशी होत नाहीत.या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ...

सिंधुदुर्ग today

इमेज
"रक्ता पलिकडचं अनोख नातं मैत्रीचं नातं जपणारा...मैत्री परिवार. भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर शशिकांत नारकर याला अनोखी मानवंदना  कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे सलग सहावे गेट टुगेदर रंगले देवगड-तारामुंबरी समुद्र किनारी तळेरे प्रतिनिधी     कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे सलग सहावे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या देवगड - तारामुंबरी येथील निसर्गरम्य अशा ओशियन व्ह्यूव रिसाॅर्टमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मैत्री परिवाराचे हे सहावे गेट टुगेदर चांगलेच अविस्मरणीय ठरले. विशेष म्हणजे भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर शशिकांत नारकर यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले आणि योगा नृत्य हे यावेळचे खास आकर्षण ठरले.        काॅलेज जीवन संपून ३० वर्षे पूर्ण झाली…पण पुनर्मिलनात पुन्हा तीच मैत्री, तेच हसणे, खिदडणे, चेष्टा, मस्करी आणि तोच आपलेपणा, मैत्री भाव आणि कौंटुबिक नात्यातील स्नेह अनुभवायला मिळाला. जुने मित्र मैत्रिणी, जिगरी दोस्तांना पुन्हा भेटण्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव -असलदे येथे हजरत असलदे वल्ली पिर बाबा चा उद्या ऊर्स मुबारक. रात्री १० वा. होणार कव्वाली चा खास कार्यक्रम  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव -असलदे येथे हजरत असलदे वल्ली युल्ला पिर बाबा चा उर्स मुबारक उद्या शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी या उर्स मुबारक ला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.     या उर्स मुबारक निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दुपारी २-वाजता दोन्ही गौसिया मस्जिद येथून पिर बाबा चा स॑दल निघेल या वेळी नाते शरीफ ;सलाम;पढत नांदगाव तिठा येथे येऊन तिथे दुपारी तीन वाजता रातीब खेळ खेळणार व सायंकाळी पाच वाजता पिर बाबा चा स॑दल तेथून निघून बाबा च्या दर्गा शरीफ येथे चालत पोहचेल व रात्री मगरीब नमाज पठण करून पिर बाबा चा स॑दल दर्गा शरीफ वर चढेल व तिथे दुऑ सलाम नातेशरीफ व नवस बोलणार व बोललेले नवस फेडणार रात्री ८ ते १० वाजेपर्यंत नियाज ( प्रसाद) वाढण्यात येईल व १० वाजता कव्वाली चा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविकांनी या उर्से मुबारक चा लाभ घ्यावा असे आवाहन नांदगाव उर्स कम...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न. ईशा बिडये पैठणीची ठरली मानकरी, द्वितीय शरयु पेडणेकर तर तृतीय अस्मिता मोरये. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.       यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी हळदीकुंकू तसेच होम मिनिस्टर कोण जिंकणार पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सौ. ईशा हरिश्चंद्र बिडये व्दितीय शरयु पेडणेकर तर तृतीय क्रमांक अस्मिता मोरये यांनी अनुक्रमे सुयश संपादन केले आहे. या तिन्ही महिलांना अनुक्रमे पैठणी देण्यात आली. एकूण २७ महिलांनी सहभाग घेतला होता. होम मिनिस्टर कार्यक्रम सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर यांनी केले.       यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पप्पी वायंगणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, उपाध्यक्ष गोपाळ मोरये, सचिव ऋषिकेश मोरजकर, खजिनदार दिलिप फोंडके, पंढरी वायंगणकर, राजेंद्र मोरजकर, निरज मोरये, कमलाकर महाडिक, रज्जाक बटवाले आदी उपस्थित होते.   ...

सिंधुदुर्ग today

इमेज
गुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर कणकवली / प्रतिनिधी गुंतवणूकी पैसे परत मागण्यासाठी आलेल्या पुणे येथील शौनक प्रकाश संकपाळ, शंभूराजे देवकाते, अशोक काकडे आदींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपी वामन उर्फ नितीन गणपत मेस्त्री (रा. कोलगाव) याची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. पुणे येथील शंभूराजे देवकाते यांनी सावंतवाडी येथील गुंतवणूकदार सागर कारिवडेकर यांच्याकडे ४ कोटी ७५ लाख रुपये गुंतविले होते. मात्र, सदरची रक्कम मुदतीत परत न दिल्याने कारिवडेकर यांची पोर्शे ही अलिशान कार नेण्याकरीता देवकाते हे आपल्या मित्रांसह कारिवडेकर यांच्या बंगल्यावर आले असता त्यांचे स्वीय सहाय्यक वामन उर्फ नितीन मेस्त्री यांनी त्यांना जिवे ठार मारण्याकरीता स्थानिक असलेल्या तहा राजगुरू, अब्दुल खान, तेहसिल दरवाजकर, तल्हा राजगुरू यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या अंगावर गाड्या घालून तसेच त्यांना लोखंडी...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा. हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा. कणकवली  (ऋषिकेश मोरजकर)  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे. या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्यासहीत विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येत आहेत. या निवडणुकांत सर्व जागांवर यश मिळविण्याच्या अनुषंगाने महायुतीने कंबर कसली आहे. गावोगावी प्रचार, नियोजनही जोरदार करण्यात येत आहे. याच प्रचाराच्या अनुषंगाने ही जा...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव विभागात बिबट्याची दहशत. नांदगाव सरपंचांचे वन विभागाला तातडीने पत्र ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात. कणकवली (ऋषिकेश मोरजकर ) कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागामध्ये सध्या बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत असून या बिबट्यासाठी आज खुद्द नांदगाव सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर यांनी एका पत्राद्वारे वनविभागाचे लक्ष वेधले असून त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.       गेले कित्येक दिवस नांदगाव तसेच असलदे परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. दिवसा तसेच रात्री अपरात्री हा बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे.         नांदगाव मधले वाडी वसंत जयराम म्हसकर यांच्या अंगणातून  दोन दिवसांपूर्वी रात्री एक वाचण्याच्या सुमारास ओटव माईण रोडवरील श्री परब यांना बिबट्याचे दर्शन झाले होते यापूर्वी  असलदे विभागात वाघीण व तिचे दोन पिल्ले दिसण्याचे ऐकविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे तरी  वनविभागाकडून लवकरात ...

सिंधुदुर्ग today

इमेज
उद्या नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम. नांदगाव  :   कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन कार्यक्रम उद्या बुधवार दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  यानिमित्त सकाळी १०:०० वा. श्री सत्यनारायण महापूजा,दु.१२:३० वा. आरती,दु.१ ते ३ महाप्रसाद,दु.३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू,दु३:३० ते ६:०० महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा,सायं. ७ :०० वा. गणेश सेवा मंडळ,नांदगांव वाघाचीवाडी याचे भजन,सायं ५:३० वा. ॐ श्री ब्राम्हणेश्वराय महिला प्रासा.भजन मंडळ,नांदगांव वाघाचीवाडी बुवा श्रुती म्हसकर याचे भजन,रात्रौ १० नतंर जय हनुमान पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ,दांडेली आरोस याचा महापौराणिक नाट्यप्रयोग शिवमंगळा गौरी होणार आहे तरी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुरेंद्र उर्फ पप्पी वायंगणकर, उपाध्यक्ष गोपाळ मोरये,खजिनदार दिलिप फोंडके ,सचिव ऋषिकेश मोरजकर यानी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
आज उद्याही नितेश साहेबांसोबत ..... संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल...  अपक्ष उमेदवारी घेतली मागे कणकवली : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. श्री. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल, आज उद्याही नितेश साहेबांसोबत .. अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहे. संतोष कानडे यांच्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून दाखवाल ती दिशा.. सांगाल तो मार्ग.. द्याल ती जबाबदारी.. शब्द ही भावना होती. निष्ठा ही श्रद्धा आहे. काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत असा मजकूर आहे. फोंडाघाट आणि हरकुळ जि प मतदारसंघात कानडे यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती. या दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतली.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समिती भाजपाकडे; हर्षदा वाळके बिनविरोध नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध. नांदगाव : (ऋषिकेश मोरजकर )  नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हा निर्णय निश्चित झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे नांदगाव पंचायत समिती मतदार संघात भाजपाचा विजय निर्विवाद ठरला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून विरोधकांना जोरदार राजकीय धक्का देण्यात आला आहे. सर्व कायदेशीर व रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात येणार आहे. या बिनविरोध निवडीमुळे नांदगाव तालुक्यात भाजपाच्या बळकटीकरणाला आणखी चालना मिळाली असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा. कणकवली : प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून, वैभववाडीनंतर आता कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. वागदे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे सदस्य दशरथ गावडे यांच्यासह माजी शाखाप्रमुख रवी गावडे, संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, राजू गावडे आदी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. यावेळी वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उ...

सिंधुदुर्ग today

इमेज
साहित्य मैत्र पुरस्कार लेखक संजय तांबे यांना तर संगीत मैत्र पुरस्कार संगीत कलावंत श्याम तेंडोलकर यांना जाहीर सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्रमंडळ पुरस्कारांची घोषणा ३१ रोजी साहित्य संगीत संमेलनात पुरस्काराचे वितरण कणकवली/प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य आणि संगीत क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात साहित्य मैत्र पुरस्कारासाठी फोंडाघाट येथील लेखक संजय तांबे यांची त्यांच्या ' समाजभान ' या वैचारिक ग्रंथासाठी तर संगीत मैत्री पुरस्काराठी कुडाळ येथील गायक वादक कलावंत श्याम तेंडोलकर यांची निवड करण्यात आली आहे. दोन हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून ३१ जानेवारी रोजी कणकवली मराठा नाट्यगृह येथे होणाऱ्या दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनात सदर पुरस्काराने श्री तांबे आणि श्री तेंडोलकर यांचा गौरव करण्यात येणार असून ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.         गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग साहित्य ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात नामदार नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत.   वैभववाडी प्रतिनिधी :       वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगला या ठिकाणी हा प्रवेश पार पडला. श्री कदम यांच्या प्रवेशाने वैभववाडीतील मनसे पूर्णता खिळखिळी बनली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.     प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे कार्यकर्ते संजय चव्हाण, गणेश गुरव, चंदन पाटणे, बबन डकरे, राजेंद्र गुरव, संतोष गुरव, बबन शिंगरे, सुरेश कदम, शांताराम कोलते, अशोक कदम, अरुणा कोलते, अरुण कोलते अवनी कदम, राजन कदम, अमोल कोलते, वनिता लाड, सुगंधा पोवार, मनीषा मनवे व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.        महेश उर्फ भैय्या कदम हे करुळ गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी उपसरपंच म्हणून काम केले आह...

सिंधुदुर्ग today

इमेज
  सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’. ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध. खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन आणि आमदार निलेश राणे यांचा सहभागातून यश.  ५ जिल्हापरिषद आणि ६ पंचायत समिती सदस्य झाले बिनविरोध.  कणकवली: (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून, जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांचा समावेश असून, या विजयाने कोकणच्या राजकारणात 'राणे'च धुरंधर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचे वर्चस्व जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. यामध्ये भाजपच्या ४ आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये खारेपाटणमधून प्...

सिंधुदुर्ग today

इमेज
  कणकवली ठाकरे शिवसेनेला धक्का ; जाणवली जिल्हा परिषद मधील ठाकरे सेनेच्या उमेदवारांची माघार जानवली जिल्हा परिषद महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध. रुहिता तांबे यांनी बिनविरोध निवडीबाबत व्यक्त केला आनंद. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ तसेच पंचायत समिती मतदार संघ बिनविरोध  होत विरोधकांना धक्का मिळत आहे. खारेपाटण जिल्हा परिषद पाठोपाठ आता जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी आज माघार घेतल्याने शिंदे सेना महायुती कडून ओटव सरपंच रुहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. रुहीता तांबे या ओटव सरपंच म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. रुहिता तांबे यांच्या शी दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी बिनविरोध निवडी बाबत आनंद व्यक्त केला आहे. आता जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवड झाल्याने त्या समाजकल्याण सभापती पदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  असलदेत डबलबारी भजनातून बुवांनी केलं समाजप्रबोधन.  गणेश जयंतीनिमित्त सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम उत्साहात ; पालकमंत्री नितेश राणे , नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपस्थिती. कणकवली दि.२३ जानेवारी :  असलदे उगवतीवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश जयंती उत्सव 2026 व सत्यनारायण पूजेनिमित्त आयोजित धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यानिमित्त श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी तालुका देवगड बुवा संतोष जोईल विरुद्ध श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडील बुवा व्यंकटेश नर यांच्यामध्ये झालेल्या डबलबारी सामन्यात दोन्ही बुवांनी समाज प्रबोधनासाठी सुंदर असे विवेचन केले. या गणेश जयंतीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे , नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देत कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.  ब्राम्हणदेव सेवा मंडळ , असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंतीनिमित्त गणेश पुजन, श्री. सत्यनारायणाची महापुजा, महाआरती,भाविकांना महाप्रसाद,महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम,मान्यवरांचे सत्कार,स्थानिक वारकरी भजने असे कार्यक्रम पार पडले. रात्रौ  10 वाजल्यानंतर श्...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून उबाठा सेनेकडून हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. कणकवली / प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून उबाठा सेनेकडून उमेदवार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर नांदगाव उबाठा सेनेचे शाखा प्रमुख हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.        यावेळी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मस्जिद बटवाले .विभाग प्रमुख तात्या निकम आबू मेस्त्री इमाम नावलेकर सोसायटी सदस्य बाळा सातोसे संभाजी पाटील विजय महाडेश्वर हर्षदा म्हसकर याकुब बटवाले  मालती माधव खोत आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव पंचायत समिती मधून बंडखोरी करत सौ. प्राची निरज मोरये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल. जनतेच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला  - निरज मोरये. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  नांदगाव पंचायत समिती मतदारसंघात ओबीसी महिला आरक्षण आहे. नांदगाव पंचायत समिती मतदार संघ हा महायुतीच्या संयुक्त जागा वाटपात भाजपा कडे गेल्याने इच्छुक असलेले व भाजपातून काही महिन्यांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केलेले नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांच्या सौभाग्यवती प्राची निरज मोरये यांनी आज अखेर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नांदगाव येथील या लढतीकडे पंचक्रोशीतचे लक्ष वेधून घेतले आहे.यावेळी त्यांच्या सोबत माजी उपसरपंच निरज मोरये उपस्थित होते. निरज मोरये यांनी बोलताना सांगितले की, मी जो माझ्या पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तो सर्व जनतेच्या आग्रहाखातर दाखल केला असल्याचे सांगितले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा महायुतीकडून संतोष पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल  नांदगाव पं.स. हर्षदा वाळके तर कासार्डे पं.स. अण्णा खाडये यांनी दाखल केला अर्ज. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नांदगाव पंचायत समिती मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार हर्षदा हनुमंत वाळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर कासार्डे पंचायत समिती मध्ये अण्णा खाडये यांनी ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.         यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी सरपंच संजय पाटील, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर,पुजा सावंत, राजू तांबे,कमलाकर पाटील, मंगेश बोभाटे मारुती मोरये, हरिश्चंद्र बिडये प्रदीप हरमलकर, रघुनाथ लोके,आयनल, कोळोशी असलदे तोंडवली बावशी नांदगाव तसेच कासार्डे विभागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  रत्नागिरीत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा उद्या "भक्ती उत्सव" सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग ;भक्ती उत्सव कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली दि.२१ जानेवारी : महाराष्ट्रातील कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग यावर कोकणभूमीला पुन्हा एकदा अध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श लाभणार आहेत.तरी या भक्ती उत्सव कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी केले आहे. जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर हे  प्राणायाम, ध्यान, योग आणि भारतीय संस्कृतीच्या अमूल्य मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रसार करत आहेत. अनेक देशांमध्ये जावून गुरुदेव श्री श्री रविशंकर कोट्यावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत. सुदर्शन क्रिया या अनोख्या श्वसनतंत्राच्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली तालुक्यात चार उमेदवारी अर्ज दाखल. आज अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ सर्वच पक्षांची उडणार झुंबड  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीसाठी कलमठ जिल्हा परिषद गटासाठी वैदही विलास गुडेकर यांनी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून आपले 2 उमेदवारी अर्ज सुचकांमार्फत दाखल केले. फोंडाघाट जिल्हा परिषद गटामधून अनंत पिळणकर , राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे 1 अर्ज , तर हरकुळ बुद्रुक पंचायत समिती गणासाठी सायली संजय तोरसकर भाजप पक्षातर्फे डमी अर्ज दाखल केला. त्यामुळे 8 जिल्हा परिषद गटासाठी व 16 पंचायत समिती गणासाठी केवळ आतापर्यंत 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.          दरम्यान आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने आज सर्वच पक्षांची झुंबड उडणार आहे हे मात्र नक्की. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.व निवडणूक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध टेबल जिल्हा परिषद गट व...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीचे संतोष पारकर यांना पक्षाने दिली उमेदवारी. नांदगाव पं. स. हर्षदा वाळके यांना पुन्हा संधी तर कासार्डे पं.स.अण्णा खाडये यांना उमेदवारी. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात "आपला हक्काचा  माणूस" कार्यकर्त्यांच्या स्टेटस ला पोस्टर. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र या इच्छुकांमधून अखेर आज कासार्डे येथील उद्योजक संतोष पारकर यांना  ए. बी. फॉर्म देत पक्षाने उमेदवारी दिली आहे.      तर नांदगाव पंचायत समिती मधून मागील निवडणूक लढविलेले हर्षदा वाळके तर  कासार्डे पंचायत समितीमध्ये सहदेव उर्फ अण्णा खाडये यांना  पक्षाने उमेदवारी दिली आहे.यात नांदगाव पंचायत समिती च्या हर्षदा वाळके यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर जिल्हा परिषद व कासार्डे पंचायत समिती ला नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.     नांदगाव पंचायत समिती मध्ये ओबीसी आरक्षण असल्याने तसेच सभापती पद ओबीसी महिला आहे. व ओबीसी महिल...

सिंधुदुर्ग today

इमेज
दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.निर्मोही फडके. 31 रोजी कणकवली मराठा मंडळ नाट्यगृहात संमेलनाचे आयोजन. स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती. कणकवली/प्रतिनिधी       गेल्या वर्षापासून साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गतर्फे साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे दुसरे साहित्य संगीत संमेलन शनिवार 31 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. कणकवली शहरातील मराठा नाट्यगृह मध्ये आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य कला अभ्यासक डॉ.निर्मोही फडके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.        एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते.अनेक कलांच्या संगमातून समाजाची निकोप वाढ होत असते.मात्र असे असले तरी कला संगम संमेलने आपल्याकडे फारशी होत नाहीत.या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य कला संगीत या क्षेत्रातील मंडळी एकत्र येत साहित्य संगीत संमेलन आयोजित केले जात आहे. या संमेलनाची रूपरेषा पुढील काही दिवसात जाहीर कर...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद - पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार. निर्णय नारायण राणेंचाच अंतिम. महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध - मंत्री नितेश राणे. कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी दिसते; मात्र एका जागेसाठी अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे. उबाठा पक्षासारखी परिस्थिती आमची नसून उमेदवार शोधण्याची गरज आम्हाला पडत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ना. नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याच्या माध्यमांतील बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले.   त्याचप्रमाणे...

सिंधुदुर्ग today

इमेज
श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी गणेश जयंती.   नांदगाव/ वार्ताहर      श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.        या उत्सवाची सुरुवात सकाळी ९:३० वाजता श्री गणेश पुजनाने होईल.सकाळी १०:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा,११:३० वाजता महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद वाटप, सायंकाळी ३:०० ते ५:०० महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,५:०० ते ७:०० लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,रात्रौ ८:०० ते १०:०० वाजता स्थानिक भजने, रात्रौ १०:०० वाजता श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी तालुका देवगड बुवा संतोष जोईल विरुद्ध श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडील बुवा व्यंकटेश नर यांच्यात डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
बावशी येथे गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.  नांदगाव/वार्ताहर    कणकवली तालुक्यातील पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशी आयोजित ‌श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर,बावशी येथे माघी गणेश जयंती उत्सवा निमित्ताने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.     बुधवारी दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता विधीवत पूजा करून या उत्सवाला सुरुवात होईल.दुपारी १२:३० वाजता आरती तर सायंकाळी ५:०० वाजता लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम,रात्रौ ८:०० वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप, गुरुवारी सकाळी ९:०० वाजता होम हवन,दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद वाटप,३:०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५:०० वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा व दिंडी, सायंकाळी ७:०० वाजता नवीन नवस बोलने व नवस फेड, रात्रौ ८:०० वाजता महाआरती, व त्यानंतर कोल्हापूर राधानगरी येथील सोंगी भजन तर शुक्रवारी पहाटे ५:०० वाजता काकड आरती ११:०० वाजता अभिषेक व पुजन दुपारी १२:०० ते ३:०० महाप्रसाद वाटप व रात्रौ ८:०० वाजता आरती करून कार्यक्रमाची सांगता होईल.तरी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर” “जि.प.साठी भाजप ३१,सेना १९, पं. स. भाजप ६३, सेना ३७ भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : ऋषिकेश मोरजकर  महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांपैकी ३१ जागा भारतीय जनता पार्टी तर १९ जागा शिवसेना (शिंदे गट) लढवणार असून, पंचायत समितीच्या जिल्ह्यातील १०० जागांपैकी ६३ जागा भाजप तर ३७ जागा शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याची अधिकृत घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नाम. नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. नारायण राणे म्हणाले की, भाजप, शिवसेना ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवयित्री निशिगंधा गावकर यांचा समता काव्य पुरस्काराने गौरव मुंबई गिरगाव साहित्य संघात अनेक मान्यवरांची उपस्थिती कणकवली/प्रतिनिधी    शहरातील कवयित्री निशिगंधा गावकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा समता गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई गिरगाव साहित्य संघात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात दोन हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाच्या या पुरस्काराने राष्ट्रीय फ्लॅारेंन्स नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या सुजाता पीटर तुस्कानो यांच्या हस्ते श्रीमती गावकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.      मुंबई एकता कल्चरल अकादमीतर्फे दरवर्षी साहित्य, कला, संगीत,नाटक,चित्रपट, चित्रकला, नृत्य आदी कला प्रकारामध्ये महाराष्ट्रातील विविध गुणवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी राज्यस्तरीय समता पुरस्कार उत्तम कवितांसाठी जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार कणकवली येथील कवयित्री निशिगंधा गावकर यांना प्राप्त झाला. ज्येष्ठ नाट्य अभिनेते उपेंद्र दाते, आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी, ज्येष्ठ संपादक प्रकाश कुलकर्णी, संगीतकार भगवान दास, ज्येष्ठ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाचा २०१७ निवडणूक मागोवा कोण किती मतांनी झाले होते विजयी पहा सविस्तर नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहीले दोन दिवस झाले असले तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही.        कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे,कोळोशी, आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ आहे. मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यावेळी काँग्रेस कडून संजय देसाई तर भाजपा सेना युती कडून संजय पाताडे अशी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीत संजय देसाई निवडून आले होते.         आता यावेळी राणेंच्या भाजपा प्रवेश नंतर तसेच शिवसेना फुटी नंतर पहिल्यांदाच जि.प.व पं.स.निवडणूका होत आहे.   २०१७ साली झालेल्या निवडणुकीत संजय ...

सिंधुदुर्ग today

इमेज
वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ.नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा कणकवली/प्रतिनिधी       वाचन संस्कृतीमुळे समाज सुसंस्कृत होत असतो.आता मात्र वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला असून बॅरिस्टर नाथ पै, यशवंतराव चव्हाण असे राष्ट्रीय पातळीवरील मराठी नेते वाचन संस्कृतीमुळेच घडले. त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते. मात्र आताचे राजकारणी स्वतःच्या असलेल्या ताब्यातील ग्रंथालयही नीट चालवत नाहीत. त्यांनी उत्तम ग्रंथ वाचणे ही तर दूरचीच गोष्ट राहिली. याचा एकत्रित परिणाम समाजावर झाला असून वाचन संस्कृती लोपपावत चालली असल्याची खंत नामवंत कवी आणि व्याख्याते अजय कांडर यांनी ओणी येथे केले.      ओणी नूतन विद्यालयाच्या बॅरिस्टर नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.यावेळी वाचन संस्कृती या व्याख्यानात बोलताना कांडर यांनी सोशल मीडियामुळे ग्रंथ वाचनावर झालेला परिणाम आणि त्याचे दीर्घकालीन तोटे याविषयी स...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न. आचारसंहितेच्या काटेकोरपणे पालन करावे -  जिल्हाधिकारी. सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी  निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संनियंत्रण समितीने कामकाज करावे. आपल्या जिल्ह्याला लागून आंतर राज्य सीमा असल्याने येथील चेक पोस्टवर पोलिस, महसूल आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बारकाईने लक्ष द्यावे असेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले.  या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवं...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार; भाजप नेते खासदार नारायण राणेंची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना नेतृत्वाखाली लढवली जाणार निवडणूक, महायुतीच्या बैठकीत निर्णय लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करू खासदार नारायण राणे यांची माहिती  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी दिली.    कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आ. प्रमोद जठार, माजी आ. अजित गोगटे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत...

सिंधुदुर्ग today

इमेज
मंत्री उदय सामंत यांनी घेतली ओम गणेश निवासस्थानी खासदार नारायण राणेंची सदिच्छा भेट. खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार; कणकवलीत उदय सामंत यांची स्पष्ट भूमिका. कणकवली ( ऋषिकेश मोरजकर) शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती लढवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.  कणकवलीत ओम गणेश निवासस्थाने जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांची  सदिच्छा भेट घेतली यावेळी भाजपा माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय आग्रे, संजू परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदेत बिबट मादीच्या वावराने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण कणकवली वनक्षेत्रपालांकडे सापळा लावण्याची मागणी : शेतकरी व नागरिकांवर जीवघेणा हल्ला होण्याची वाट पाहू नका. असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांची मागणी. कणकवली दि.१५ जानेवारी  : असलदे गावात सरस्वती हायस्कुल नांदगाव या स्कुलच्या पाठीमागील भागात एक बिबट मादी व दोन पिल्ले असे तीन बिबट वावरत आहेत. या ठिकाणी शाळेतील मुले त्या परिसरात असतात. तसेच असलदे धनगरवाडी नदीकिनारी असलेला भाग व गावठण दिवानसानेवाडी भागात या बिबट्यांचा वावर सुरु आहे. या बिबट मादीसह त्यांच्या पिल्लांना सापळा लावून पकडावे , अशी मागणी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केली आहे.  दरम्यान, देवगड निपाणी महामार्गालगत शेतकरी गोविंद महादेव पारकर यांच्या गायीच्या वासराला बिबट मादीने ठार मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. तसेच असलदे गावठणवाडी  येथील दोन वासरांना बिबट्याने गेल्या 2 महिन्यांत ठार केले आहे. त्याठिकाणी बिबट मा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  मुंबई गोवा महामार्गावर असलदे ग्रिन फिल्ड दरम्यान दोन दुचाकींचा अपघात ;दोन्ही दुचाकीस्वार जखमी  नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ब्रिज वरील असलदे ग्रिन फिल्ड दरम्यान आज दुपारी ३.३० च्या सुमारास दोन दुचाकींची एका मेकाला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून जखमींना तातडीने नांदगाव येथील श्री नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिकेतून चालक अमोल तेली यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.       जखमींवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (ऋषिकेश मोरजकर) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून महसूल व पोलिस विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे सर्व संबंधितांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलिस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक ड...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद साठी इच्छुकांची गर्दी.  उद्या होणाऱ्या कणकवली येथील महायुतीच्या संयुक्त बैठकीकडे  सिंधुदुर्ग जिल्हयाचे लक्ष केंद्रित. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  महानगरपालिका निवडणुक रणधुमाळी होण्यापूर्वीच दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर करण्यात आल्या यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ५० जिल्हा परिषद मतदार संघ कार्यरत आहेत .       नगरपंचायत, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिंदे सेना महायुती झाली नव्हती. पण आताच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिंदे सेना तसेच अजित पवार राष्ट्रवादी महायुती चर्चा करण्यासाठी खासदार नारायणराव राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दिपक केसरकर,आम. निलेश राणे तसेच इतर नेत्यांची एकत्रितपणे बैठक उद्या शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी कणकवलीत होणार आहे. यामुळे महायुतीतील कार्यकर्ते तसेच इच्छूक उमेदवारांचे तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष उद्या होणाऱ्या कणकवलीतील बैठकीकडे लागून राहिले आहे.