सिंधुदुर्ग today
बावशी येथे गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
नांदगाव/वार्ताहर
कणकवली तालुक्यातील पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशी आयोजित श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर,बावशी येथे माघी गणेश जयंती उत्सवा निमित्ताने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता विधीवत पूजा करून या उत्सवाला सुरुवात होईल.दुपारी १२:३० वाजता आरती तर सायंकाळी ५:०० वाजता लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम,रात्रौ ८:०० वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप, गुरुवारी सकाळी ९:०० वाजता होम हवन,दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद वाटप,३:०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५:०० वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा व दिंडी, सायंकाळी ७:०० वाजता नवीन नवस बोलने व नवस फेड, रात्रौ ८:०० वाजता महाआरती, व त्यानंतर कोल्हापूर राधानगरी येथील सोंगी भजन तर शुक्रवारी पहाटे ५:०० वाजता काकड आरती ११:०० वाजता अभिषेक व पुजन दुपारी १२:०० ते ३:०० महाप्रसाद वाटप व रात्रौ ८:०० वाजता आरती करून कार्यक्रमाची सांगता होईल.तरी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा