सिंधुदुर्ग today
नांदगाव -असलदे येथे हजरत असलदे वल्ली पिर बाबा चा उद्या ऊर्स मुबारक.
रात्री १० वा. होणार कव्वाली चा खास कार्यक्रम
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव -असलदे येथे हजरत असलदे वल्ली युल्ला पिर बाबा चा उर्स मुबारक उद्या शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी या उर्स मुबारक ला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
या उर्स मुबारक निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दुपारी २-वाजता दोन्ही गौसिया मस्जिद येथून पिर बाबा चा स॑दल निघेल या वेळी नाते शरीफ ;सलाम;पढत नांदगाव तिठा येथे येऊन तिथे दुपारी तीन वाजता रातीब खेळ खेळणार व सायंकाळी पाच वाजता पिर बाबा चा स॑दल तेथून निघून बाबा च्या दर्गा शरीफ येथे चालत पोहचेल व रात्री मगरीब नमाज पठण करून पिर बाबा चा स॑दल दर्गा शरीफ वर चढेल व तिथे दुऑ सलाम नातेशरीफ व नवस बोलणार व बोललेले नवस फेडणार रात्री ८ ते १० वाजेपर्यंत नियाज ( प्रसाद) वाढण्यात येईल व १० वाजता कव्वाली चा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविकांनी या उर्से मुबारक चा लाभ घ्यावा असे आवाहन नांदगाव उर्स कमेटी तर्फे करण्यात आले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा