सिंधुदुर्ग today



नांदगाव पंचायत समिती मधून बंडखोरी करत सौ. प्राची निरज मोरये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल.

जनतेच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला  - निरज मोरये.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

नांदगाव पंचायत समिती मतदारसंघात ओबीसी महिला आरक्षण आहे. नांदगाव पंचायत समिती मतदार संघ हा महायुतीच्या संयुक्त जागा वाटपात भाजपा कडे गेल्याने इच्छुक असलेले व भाजपातून काही महिन्यांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केलेले नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांच्या सौभाग्यवती प्राची निरज मोरये यांनी आज अखेर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नांदगाव येथील या लढतीकडे पंचक्रोशीतचे लक्ष वेधून घेतले आहे.यावेळी त्यांच्या सोबत माजी उपसरपंच निरज मोरये उपस्थित होते. निरज मोरये यांनी बोलताना सांगितले की, मी जो माझ्या पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तो सर्व जनतेच्या आग्रहाखातर दाखल केला असल्याचे सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today