सिंधुदुर्ग today



जिल्हा परिषद साठी इच्छुकांची गर्दी. 

उद्या होणाऱ्या कणकवली येथील महायुतीच्या संयुक्त बैठकीकडे  सिंधुदुर्ग जिल्हयाचे लक्ष केंद्रित.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

महानगरपालिका निवडणुक रणधुमाळी होण्यापूर्वीच दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर करण्यात आल्या यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ५० जिल्हा परिषद मतदार संघ कार्यरत आहेत .

      नगरपंचायत, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिंदे सेना महायुती झाली नव्हती. पण आताच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिंदे सेना तसेच अजित पवार राष्ट्रवादी महायुती चर्चा करण्यासाठी खासदार नारायणराव राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दिपक केसरकर,आम. निलेश राणे तसेच इतर नेत्यांची एकत्रितपणे बैठक उद्या शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी कणकवलीत होणार आहे. यामुळे महायुतीतील कार्यकर्ते तसेच इच्छूक उमेदवारांचे तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष उद्या होणाऱ्या कणकवलीतील बैठकीकडे लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today