सिंधुदुर्ग today
नांदगाव विभागात बिबट्याची दहशत. नांदगाव सरपंचांचे वन विभागाला तातडीने पत्र
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर )
कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागामध्ये सध्या बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत असून या बिबट्यासाठी आज खुद्द नांदगाव सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर यांनी एका पत्राद्वारे वनविभागाचे लक्ष वेधले असून त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
गेले कित्येक दिवस नांदगाव तसेच असलदे परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. दिवसा तसेच रात्री अपरात्री हा बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे.
नांदगाव मधले वाडी वसंत जयराम म्हसकर यांच्या अंगणातून दोन दिवसांपूर्वी रात्री एक वाचण्याच्या सुमारास ओटव माईण रोडवरील श्री परब यांना बिबट्याचे दर्शन झाले होते यापूर्वी असलदे विभागात वाघीण व तिचे दोन पिल्ले दिसण्याचे ऐकविण्यात आले आहे.
यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे तरी वनविभागाकडून लवकरात लवकर सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून काहीतरी ठोस उपाय योजना व्हावी अशी मागणी नांदगाव सरपंच मोरजकर यांनी केली असून हा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थ आंदोलनच्या पवित्र असल्याचे शेवटी पत्रात नमूद केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा