सिंधुदुर्ग today

 

कणकवली ठाकरे शिवसेनेला धक्का ; जाणवली जिल्हा परिषद मधील ठाकरे सेनेच्या उमेदवारांची माघार

जानवली जिल्हा परिषद महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध.

रुहिता तांबे यांनी बिनविरोध निवडीबाबत व्यक्त केला आनंद.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ तसेच पंचायत समिती मतदार संघ बिनविरोध  होत विरोधकांना धक्का मिळत आहे. खारेपाटण जिल्हा परिषद पाठोपाठ आता जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी आज माघार घेतल्याने शिंदे सेना महायुती कडून ओटव सरपंच रुहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. रुहीता तांबे या ओटव सरपंच म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. रुहिता तांबे यांच्या शी दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी बिनविरोध निवडी बाबत आनंद व्यक्त केला आहे.

आता जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवड झाल्याने त्या समाजकल्याण सभापती पदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today