सिंधुदुर्ग today
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा महायुतीकडून संतोष पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नांदगाव पं.स. हर्षदा वाळके तर कासार्डे पं.स. अण्णा खाडये यांनी दाखल केला अर्ज.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नांदगाव पंचायत समिती मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार हर्षदा हनुमंत वाळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर कासार्डे पंचायत समिती मध्ये अण्णा खाडये यांनी ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी सरपंच संजय पाटील, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर,पुजा सावंत, राजू तांबे,कमलाकर पाटील, मंगेश बोभाटे मारुती मोरये, हरिश्चंद्र बिडये प्रदीप हरमलकर, रघुनाथ लोके,आयनल, कोळोशी असलदे तोंडवली बावशी नांदगाव तसेच कासार्डे विभागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा