सिंधुदुर्ग today


कणकवलीत उद्या दुसरे साहित्य संगीत संमेलन

साहित्य संगीत संमेलनाची रूपरेषा जाहीर ; गायन,पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन

कणकवली/प्रतिनिधी

      गेल्या वर्षापासून साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गतर्फे साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे दुसरे साहित्य संगीत संमेलन शनिवार 31 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. कणकवली शहरातील मराठा नाट्यगृह मध्ये आयोजित करण्यात आले असून संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपशास्त्रीय, चित्रपट आणि भावगीते गायन, साहित्य संगीत क्षेत्रातील पुरस्कार वितरण आणि निमंत्रितांचे कवी संमेलन अशा कार्यक्रमांचा समावेश असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अभ्यासक आणि संगीत संशोधक डॉ.निर्मोही फडके यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.

       एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते.अनेक कलांच्या संगमातून समाजाची निकोप वाढ होत असते.मात्र असे असले तरी कला संगम संमेलने आपल्याकडे फारशी होत नाहीत.या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य कला संगीत क्षेत्रातील मंडळी एकत्र येत साहित्य संगीत संमेलन आयोजित केले जात आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी तथा चित्रपट गीतकार अजय कांडर यांची निवड करण्यात आली होती. यावर्षी दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य आणि कला संस्कृतीच्या अभ्यासक असणाऱ्या डॉ.निर्मोही फडके यांची निवड करण्यात आली असून डॉ. निर्मोही या ठाणे येथील लेखिका आणि मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील संशोधक आहेत. या कार्यक्रमात लेखक संजय तांबे यांना साहित्य मैत्र पुरस्कार तर सुप्रसिद्ध गायक वादक श्याम तेंडोलकर यांना संगीत मैत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावेळी श्याम तेंडोलकर यांची संगीत मैफल ही आयोजित करण्यात आली आहे.

     संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून या कवी संमेलनासाठी भालचंद्र सुपेकर, मधुकर मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे, संचिता चव्हाण, रिमा भोसले, रीना पाटील, निशिगंधा गावकर, प्रियदर्शनी पारकर, संगीता पाटील, विद्या पाटील, संदेश तुळसणकर, नंदिनी रावराणे, सायली नारकर, सागर कदम, हर्षल तांबे, संजय तांबे, सिद्धेश खटावकर, विजयकुमार शिंदे, माधव गावकर, अर्चना गव्हाणकर, किशोर कदम, मेघना सावंत, पल्लवी शिरगावकर ,समीक्षा चव्हाण , धम्मपाल बाविस्कर , शर्मिला केळुसकर, संदीप कदम, आर्या कदम, सुरेश पवार ,सत्यवान साटम ,अमर पवार ,दर्शना पाताडे, के एस वरदेकर, प्रगती पाताडे ,स्वराज चव्हाण, रामचंद्र शिरोडकर, मंगेश आरेकर, नैतिक मोरजकर,  सुधीर गोठणकर, सूर्यकांत साळुंखे, निलेश जाधव, मालिनी लाड, मनोहर सरमळकर, वैष्णवी सुतार यांना कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today