सिंधुदुर्ग today
कणकवली तालुक्यात चार उमेदवारी अर्ज दाखल.
आज अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ
सर्वच पक्षांची उडणार झुंबड
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीसाठी कलमठ जिल्हा परिषद गटासाठी वैदही विलास गुडेकर यांनी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून आपले 2 उमेदवारी अर्ज सुचकांमार्फत दाखल केले. फोंडाघाट जिल्हा परिषद गटामधून अनंत पिळणकर , राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे 1 अर्ज , तर हरकुळ बुद्रुक पंचायत समिती गणासाठी सायली संजय तोरसकर भाजप पक्षातर्फे डमी अर्ज दाखल केला. त्यामुळे 8 जिल्हा परिषद गटासाठी व 16 पंचायत समिती गणासाठी केवळ आतापर्यंत 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
दरम्यान आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने आज सर्वच पक्षांची झुंबड उडणार आहे हे मात्र नक्की.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.व निवडणूक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध टेबल जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी निवडणूक अधिकारी यांच्याकडून दाखल नामर्निदेशन पत्राची तपासणी करुन अर्ज स्विकारले जात आहेत. अपेक्षेप्रमाणे शेवटच्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा