सिंधुदुर्ग today



साहित्य मैत्र पुरस्कार लेखक संजय तांबे यांना तर संगीत मैत्र पुरस्कार संगीत कलावंत श्याम तेंडोलकर यांना जाहीर

सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्रमंडळ पुरस्कारांची घोषणा

३१ रोजी साहित्य संगीत संमेलनात पुरस्काराचे वितरण

कणकवली/प्रतिनिधी

      सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य आणि संगीत क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात साहित्य मैत्र पुरस्कारासाठी फोंडाघाट येथील लेखक संजय तांबे यांची त्यांच्या ' समाजभान ' या वैचारिक ग्रंथासाठी तर संगीत मैत्री पुरस्काराठी कुडाळ येथील गायक वादक कलावंत श्याम तेंडोलकर यांची निवड करण्यात आली आहे. दोन हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून ३१ जानेवारी रोजी कणकवली मराठा नाट्यगृह येथे होणाऱ्या दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनात सदर पुरस्काराने श्री तांबे आणि श्री तेंडोलकर यांचा गौरव करण्यात येणार असून ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

        गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळतर्फे साहित्य आणि संगीत क्षेत्रातील कलावंता प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य संगीत संमेलन आयोजित केले जाते. यानिमित्त साहित्य आणि संगीत क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध केलेल्या कलावंताना साहित्य मैत्र आणि संगीत मैत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या वर्षीच्या या पुरस्कारासाठी कवी अजय कांडर आणि महेंद्र चव्हाण या परीक्षक मंडळाने या दोन पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. संजय तांबे हे कोकणातील ज्येष्ठ लेखक कवी असून गेली 40 वर्षे निष्ठेने लेखन करत आहेत.त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली असून सभाजभान या ग्रंथाला हा साहित्य मैत्र पुरस्कार जाहीर झाला आहे.सभाजभान या ग्रंथाला ज्येष्ठ विचारवंत डॉ.अशोक पळवेकर यांनी दीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली असून समाजातील राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक,स्त्रीमुक्ती आदी विषयाच्या अनुषंगाने लेखन या ग्रंथात l आहे.त्यामुळे एका सशक्त वैचारिक लेखसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर संगीत मैत्र पुरस्कार दिलेले श्याम तेंडुलकर हे कुडाळ येथील लोकप्रिय कलावंत असून शास्त्रीय संगीत, ख्याल गायन,तबला व हार्मोनियम वादन यात त्यांचे मोठे नाव लौकिक आहे. राजन माडये,(आग्रा घराणे) बाळ आंबर्डेकर यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले आहे.त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली असून दूरदृशनवरही त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत.या दोन्ही पुरस्कार विजेत्यांचे सिंधुदुर्गच्या संस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today