सिंधुदुर्ग today



कवयित्री निशिगंधा गावकर यांचा समता काव्य पुरस्काराने गौरव

मुंबई गिरगाव साहित्य संघात अनेक मान्यवरांची उपस्थिती

कणकवली/प्रतिनिधी

   शहरातील कवयित्री निशिगंधा गावकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा समता गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई गिरगाव साहित्य संघात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात दोन हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाच्या या पुरस्काराने राष्ट्रीय फ्लॅारेंन्स नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या सुजाता पीटर तुस्कानो यांच्या हस्ते श्रीमती गावकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

     मुंबई एकता कल्चरल अकादमीतर्फे दरवर्षी साहित्य, कला, संगीत,नाटक,चित्रपट, चित्रकला, नृत्य आदी कला प्रकारामध्ये महाराष्ट्रातील विविध गुणवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी राज्यस्तरीय समता पुरस्कार उत्तम कवितांसाठी जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार कणकवली येथील कवयित्री निशिगंधा गावकर यांना प्राप्त झाला. ज्येष्ठ नाट्य अभिनेते उपेंद्र दाते, आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी, ज्येष्ठ संपादक प्रकाश कुलकर्णी, संगीतकार भगवान दास, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे आदींच्या उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात कवयत्री निशिगंधा गावकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.निशिगंधा गावकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीतील कवयित्री असून त्या निष्ठेने काव्य लेखन गेली अनेक वर्ष करत आहेत. साहित्यिक नियतकालिके आणि दिवाळी अंक यामधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात.तसेच निमंत्रितांच्या कवी संमेलनातही त्यांचं काव्य वाचन झालेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today