सिंधुदुर्ग today
नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.
ईशा बिडये पैठणीची ठरली मानकरी, द्वितीय शरयु पेडणेकर तर तृतीय अस्मिता मोरये.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी हळदीकुंकू तसेच होम मिनिस्टर कोण जिंकणार पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सौ. ईशा हरिश्चंद्र बिडये व्दितीय शरयु पेडणेकर तर तृतीय क्रमांक अस्मिता मोरये यांनी अनुक्रमे सुयश संपादन केले आहे. या तिन्ही महिलांना अनुक्रमे पैठणी देण्यात आली. एकूण २७ महिलांनी सहभाग घेतला होता. होम मिनिस्टर कार्यक्रम सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर यांनी केले.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पप्पी वायंगणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, उपाध्यक्ष गोपाळ मोरये, सचिव ऋषिकेश मोरजकर, खजिनदार दिलिप फोंडके, पंढरी वायंगणकर, राजेंद्र मोरजकर, निरज मोरये, कमलाकर महाडिक, रज्जाक बटवाले आदी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती मृत्यू झाल्याने श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच माजी अध्यक्ष पप्पी सापळे यांना ही श्रध्दांजली वाहण्यात आली.
ॐ श्री ब्राम्हणेश्वर महिला प्रासा.भजन मंडळ,नांदगांव बुवा श्रुती म्हसकर तसेच गणेश सेवा मंडळ,नांदगांव वाघाचीवाडी यांचे दिंडी भजन संपन्न झाले. जय हनुमान पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ,दांडेली आरोस याचा महापौराणिक नाट्यप्रयोग शिवमंगळा गौरी नाट्य प्रयोग ही संपन्न झाला.
या पुजे निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये,संजय देसाई, बुवा प्रकाश पारकर, उद्योजक संतोष पारकर, नांदगाव पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्या सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कासार्डे पेट्रोल पंप मालक श्री पोकळे , तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, माजी अध्यक्ष दत्तात्रय कल्याणकर आदी व्यापारी पदाधिकारी यांनी भेट दिली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा