सिंधुदुर्ग today
उद्या नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम.
नांदगाव :
कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन कार्यक्रम उद्या बुधवार दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्त सकाळी १०:०० वा. श्री सत्यनारायण महापूजा,दु.१२:३० वा. आरती,दु.१ ते ३ महाप्रसाद,दु.३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू,दु३:३० ते ६:०० महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा,सायं. ७ :०० वा. गणेश सेवा मंडळ,नांदगांव वाघाचीवाडी याचे भजन,सायं ५:३० वा. ॐ श्री ब्राम्हणेश्वराय महिला प्रासा.भजन मंडळ,नांदगांव वाघाचीवाडी बुवा श्रुती म्हसकर याचे भजन,रात्रौ १० नतंर जय हनुमान पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ,दांडेली आरोस याचा महापौराणिक नाट्यप्रयोग शिवमंगळा गौरी होणार आहे तरी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुरेंद्र उर्फ पप्पी वायंगणकर, उपाध्यक्ष गोपाळ मोरये,खजिनदार दिलिप फोंडके ,सचिव ऋषिकेश मोरजकर यानी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा