सिंधुदुर्ग today
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाचा २०१७ निवडणूक मागोवा
कोण किती मतांनी झाले होते विजयी पहा सविस्तर
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहीले दोन दिवस झाले असले तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही.
कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे,कोळोशी, आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ आहे. मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यावेळी काँग्रेस कडून संजय देसाई तर भाजपा सेना युती कडून संजय पाताडे अशी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीत संजय देसाई निवडून आले होते.
आता यावेळी राणेंच्या भाजपा प्रवेश नंतर तसेच शिवसेना फुटी नंतर पहिल्यांदाच जि.प.व पं.स.निवडणूका होत आहे.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत संजय देसाई यांना एकूण मते ४२६२ तर संजय पाताडे २७३४ मते मिळाली होती. एकूण १५२८ च्या फरकाने संजय देसाई विजयी झाले होते.
नांदगाव पंचायत समिती मधून हर्षदा वाळके विरुद्ध सोनाली डामरे अशी लढत पाहायला मिळाली होती.सेनेकडून उमेदवार असलेल्या सोनाली डामरे यांना ४०० मतांनी पराभव करत हर्षदा वाळके यांनी विजय मिळविला होता. हर्षदा वाळके २०८८ तर सोनाली डामरे १६८८ मते मिळाली होती.
कासार्डे पंचायत समिती मतदार संघातून प्रकाश पारकर विरुद्ध बाळाराम तानवडे व सुधाकर पेडणेकर अशी लढत पाहायला मिळाली होती या लढतीत प्रकाश पारकर यांनी विजय मिळविला होता.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहीले दोन दिवस झाले असले तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा