सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे किशोर मोरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त निराधार लाभार्थ्यांना शासनाच्या पेन्शन योजनेची देण्यात आली माहिती. 

कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार.

या पुढेही किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रस्तावासाठी सर्वतोपरी सहकार्य. 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कै.किशोर मोरजकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या माध्यमातून आज गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी नांदगाव येथे निराधार, श्रावण बाळ पेन्शन  आवश्यक आहे अशा लाभार्थ्यांना परिपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच फॉर्म सोबत लागणारे कागदपत्र यांची माहिती देण्यात आली. असून ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे पूर्ण होती त्यांचे अर्ज भरण्यात येवून परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आले. तसेच या ही पुढे असे प्रस्ताव तयार करण्यासाठी लाभार्थी यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.

       नांदगाव ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या या पेन्शन योजनेची माहिती कार्यक्रमात सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू तांबे, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, मारुती मोरये, कमलाकर पाटील, विजय महाडेश्वर आदी उपस्थित होते.

         यावेळी किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले की, आजच्या दिनी ज्या लाभार्थी यांना पेन्शन योजनेची आवश्यकता आहे. अशा सर्व लाभार्थ्यांना या पेन्शन योजनेसाठी किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार असून आज याचा शुभारंभच झाला आहे. या पुढे अशा लाभापासून वंचित राहू नये यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी कागदपत्रे पूर्ण करुन किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट जवळ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today