सिंधुदुर्ग today



गजानन विकास मित्र मंडळ कोळोशी यांच्या वतीने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वितरण.

नांदगाव प्रतिनिधी 

           गजानन विकास मित्र मंडळाकडून नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक,क्रिडा, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबविले जातात.नुकतेच मंडळाकडून शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड,जि.प.शाळा कोळोशी -हडपिड,जि.प.शाळा हडपिड,जि.प.शाळा कोळोशी वरची वाडी,जि.प.शाळा आयनल मनेरवाडी अशा पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप केले.

प्रशाले मधील सर्व विद्यार्थ्यांना गजानन विकास मित्र मंडळ कोळोशी यांच्यामार्फत वह्या, पेन व शालेय साहित्य वितरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजन सावंत, खजिनदार चंद्रकांत शिंदे, सचिव संतोष चव्हाण, स्थानिक कमिटी सदस्य महादेव पावसकर, सानिका इंदप, सत्यवान राणे, सुचिता पोकळे, नम्रता इंदप आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शी. प्र. मंडळाचे कार्यवाह श्री. सुरेश राणे व शाळा समिती अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण उपस्थित होते.

  या मंडळामार्फत दरवर्षी पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे  वितरण केले जाते.त्यांच्या या कार्याबद्दल कोळोशी -हडपिड हायस्कूलच्या संस्थे मार्फत त्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांच्या या सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

 उपस्थित्यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. आश्विनी गर्जे यांनी केले तर आभार श्री.किरणकुमार पाताडे यांनी मानले.यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या