सिंधुदुर्ग today
मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना.
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली विभागामार्फत गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुक्यातील पाच शिवस्मारकांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे तसेच अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आणि गुरू आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेतर्फे शिवस्मारक पूजन मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली.
यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहिती अधिकारी नील आचरेकर तसेच इतर मावळे व रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा