सिंधुदुर्ग today
सुधारित पीक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी लाभ घ्यावा
शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक
पीक विमा काढल्यानंतर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.
कणकवली प्रतिनिधी
राज्यात २०२६- २७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली असून, भात शेती उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांनी केले आहे
पत्रकात श्री. अर्जुन जाधव यांनी म्हटले आहे की. राज्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सधारित प्रधानमंत्र पीक विमा योजना ३ जुलैपासून लागृ केली आहे. यामळे अधिसचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चाल वर्षीाचे सरासरी उत्पादन हे उंबरठ उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई" लागू होणार आहे. भात व नागली पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल. अंतिम तारीख ३१ जुलै आहे. केंद्राच्या पीक विमा पोर्टल व' ऑनलाईन सहभाग नोंदविता येईल. यात बँक, कॉमन सर्विस सेंटर, किंवा स्वतः शेतकरी ऑनलाईन अर्ज भरून भाग घेऊ शकतो. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक आहे. जमिनीची कागदपत्र पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंटसाठी ते बँक खात्याला जोडलेले असावे. शेतकऱ्यांन ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे, मधील पीक व विमा घेतलेले पीव यात तफावत आढळल्यास ई-पीक सब्देमध्ये' नोंदविले' पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल व यात तफावत असल्यास विमा अर्ज रद्द होईल योजनेत चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पुढील पाच वर्ष कृषी विषयक योजनांपासून वंचित राहावें लागेल. योजनेत भाग घेण्यासाठी किमान 0.१% हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा