सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे (SIR) मतदार यादी दुरुस्ती काम ५० टक्के वर.

मतदार नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे तिनं ही बुथ वर मतदार यादी अद्ययावत दुरुस्ती करण्याचे काम घरोघरी जाऊन सुरू आहे. तरी मतदार नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

      पहिल्या टप्प्यात त्यांना घरोघरी अर्ज वितरित करण्यात आले. तर आता ते जमा करण्याचे काम सुरू आहे. जर कोणाला अर्ज भरताना अडचणी येत असतील तर त्यांना BLO व सहाय्यक मदत करत आहेत.

       SIR.. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून दुबार मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अॅड केले जाते.

अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.

या प्रक्रियेत नक्की काय होते?

बीएलओ स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही, याची खात्री करतात. काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात.मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळली जातात.तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. मतदार यादी अद्ययावत दुरुस्ती करण्याचे काम सध्या नांदगाव येथील तिनं ही बुथ निहाय सुरू आहे.

Blo कृषी सेवक पवार, त्यांचे सहायक कोतवाल गावकर, दुसरे Blo संतोष देसाई तर सहाय्यक ग्रामपंचायत कर्मचारी लवू पारकर, तर Blo जाधव तर सहाय्यक पोलीस पाटील वृषाली मोरजकर हे सर्व काम पाहत आहेत. दरदिवशी यांचा आढावा नांदगाव मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव यांच्या वतीने घेतला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today