सिंधुदुर्ग today
नांदगाव सर्व्हिस रोड लगत ट्रक विद्युत पोल ला धडकून अपघात.
अपघातामुळे दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद.
अपघाताने पडलेला भला मोठा चर बुजवण्याची मागणी.
कणकवली प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज सर्व्हिस रोड लगत आज पहाटे ४ च्या सुमारास विद्युत पोल ला धडकून ट्रकचा अपघात झाला. या अपघातामुळे आज दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद पडली होती.
सदर अपघातामुळे रस्ता खचला असून विद्युत पोल मोडले आहेत. सुदैवाने कोणीही यात जखमी झाले नाही. सदर अपघात ग्रस्त ट्रक आज सायंकाळी काढण्यात आला. मात्र त्या ठिकाणी भला मोठा चर पडल्यामुळे व याच ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दुसरा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने त्या ठिकाणी संरक्षण कठडा बांधून रस्त्यावर अपघातामुळे पडलेला चर बुजविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा