पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा  कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छा ऋषिकेश मोरजकर : सिंधुदुर्ग  मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)  अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या  ट्विटला रि ट्विट करत जलसेवेच्या शुभारंभाला शुभेच्छा दिल्या आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,“मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. यामुळे कोकणवासियांना सागरी मार्गाने जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सेवेद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यानची बहुप्रतिक्षित ...

सिंधुदुर्ग today

इमेज
भाषा उच्चशिक्षितांनी संपवली आणि अडाण्यांनी जपली. माझं जगणं माझी भाषा ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन. कणकवली/प्रतिनिधी         समाज ज्यांना अडाणी समजतो त्याच वर्गाने जगातील कोणतीही बोलीभाषा जपली आहे. तर उच्चशिक्षित वर्गाने भाषा शुद्धीकरणाच्या नावाखाली प्रमाणभाषेलाच सर्वाधिक महत्त्व दिले. मात्र बोली जपल्या गेल्या तरच प्रमाणभाषा टिकते हे भान या उच्चशिक्षित वर्गाने न जपल्यामुळे उच्चशिक्षित वर्गाने भाषा संपवली या निष्कर्षापर्यंत आपण येऊ शकतो असे स्पष्ट प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी 'आपलं जगणं आपली भाषा' या व्याख्यानात केले.       मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात कवी अजय कांडर यांचे 'माझं जगणं माझी भाषा ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यानिमित्ताने बोलताना कांडर यांनी जेवढा समाज उच्चशिक्षित आणि श्रीमंत होत जातो तेवढा तो भाषेपासून दूर जात असतो असेही निरीक्षण नोंदविले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी विलास कोळपे, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्रीमती आठले, उपप्राचार्य श्रीमती कदम, मराठ...

सिंधुदुर्ग today

इमेज
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कणकवली : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे - दुपारी १२.३० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, दुपारी ०१.२५वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून आकासा एअर QP- 1380 विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०२.३० वा.  मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, दुपारी ०४.३० वा. भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनास उपस्थिती ( श्री. बंड्या मांजरेकर मित्रमंडळ ), सायं. ०६.०० वा. रामेश्वर प्रतिष्ठान, मिठबांव क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनास उपिस्थती ( संदर्भ : श्री. शैलेश लोके ), सायं. ०६.३० वा. मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. मनोहर आंत...

सिंधुदुर्ग today

इमेज
  १ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू; मंत्री नितेश राणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना. तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद  सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्ध. ऋषिकेश मोरजकर : (सिंधुदुर्ग )  जलवाहतूक (रो - रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच  मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्च पासून  सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य  व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली.     यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले,मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला  जलमार्ग...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांचे 'माझं जगणं माझी भाषा' विषयावर  २७ रोजी रत्नागिरी येथे व्याख्यान कणकवली/प्रतिनिधी        मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भाषादिन कार्यक्रमात कवी अजय कांडर यांचे माझं जगणं माझी भाषा या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर विषयावरील कवी कांडर यांचे व्याख्यान जळगाव बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह महाराष्ट्राच्या विविध भागात यापूर्वीही आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे कांडर यांना सदर व्याख्यानासाठी मराठी भाषा दिनानिमित्त रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.      कवी अजय कांडर हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, अभ्यासू स्तंभ लेखक आणि व्याख्याते म्हणून सर्वत्र परिचित आहेत. युगानुयुगे तूच ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कविता आणि  महात्मा गांधी यांच्यावरील अजूनही जिवंत आहे गांधी या दोन्ही कविता त्यांच्या बहुचर्चित आहेत. या दोन कवितेच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारावर त्यांची विश...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव उर्दू शाळेचा  वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा कणकवली प्रतिनिधी   नांदगाव उर्दू शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी नांदगाव गावाचे सरपंच रविराज मोरजकर , नांदगाव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके , कार्यक्रमाचे अध्यक्ष  अहमद बटवाले, उपसरपंच  इरफान साठविलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  यासीन बटवाले, उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष  सईद बटवाले,ग्रामपंचायत सदस्य  रमीजान बटवाले, तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे , पोलीस पाटील वृषाली मोरजकर, उपाध्यक्ष  रजिया सारवण,  अब्दुल रजाक बटवाले, अब्दुल मजीद बटवाले, बाळा मोरये, फिरोज साठविलकर,  मुख्याध्यापक श्री. मुस्ताक कितुर आदी मान्यवर उपस्थित होते.          कार्यक्रमाची सुरुवात किरात व हमद पठणाने करण्यात आली. मान्यवरांचे यथोचित सन्मान करून शिष्यवृत्ती परीक्षा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, अबॅकस मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेतील यश व बॅडमिंटन आणि कॅरम स्पर्धेतील विजेते विद्यार्थ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नाम .नितेश राणे यांची मोठी घोषणा; सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी नवी आरोग्य मोहीम गोवा धाव टाळण्यासाठी जिल्ह्यातच विशेष उपचार सुविधा रिक्त पदांबाबत बजेट अधिवेशनात निर्णय घेणार  मोफत तपासणी व औषधांमुळे गरीब रुग्णांना मिळणार मोठा दिलासा आरोग्य सेवेतील त्रुटींवर थेट दखल; दर तीन महिन्यांनी घेणार आढावा कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोव्याला धाव घ्यावी लागू नये, यासाठी आता दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.  यावेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डिन डॉ.अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिक...

सिंधुदुर्ग today

इमेज
पेन्शनर असोसिएशन सभेत विविध विषयावर चर्चा कणकवली/प्रतिनिधी        येथील पेन्शन असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पेन्शनर असोसिएशन सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि काही ठोस निर्णय घेण्यात आले.    सदर सभेत पुढील प्रमाणे महत्त्वाचे ठराव व निर्णय घेण्यात आले. पेनशर भवनची मासिक सभा दरमहाचे दहा तारीख ऐवजी दरमहाच्या  5 तारीखला सकाळी 10.30 वा.घेण्यात येईल.पेन्शनर भवनकडे जाणारी पायवाट आहे, ती ग्रामपंचायत कलमठने तेथे पायऱ्या व रॅम्प बांधून देण्याचे काम मंजूर केले.त्यासाठी रु.60000 निधी  उपलब्ध होताच काम सुरू करुन पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायत अधिकारी व संरपच यांनी दिले. त्याची माहिती सभेत देण्यात आली. याबाबत अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.गुरु शिष्य प्रेम पत्र स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झाल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी सुगंधा देवरुखकर यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. त्याच बरोबर सुगंधा देवरुखकर यांनी 1 लाख रक्कमेची फिक्स डिपॉझिट करून त्याच येणारे तिमाही व्याज 2686 रुपये पेन्शनर संघटनेच्या कामकाजासाठी  व त्यांच्या पश्चात...

सिंधुदुर्ग today

इमेज
कुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा  कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  पल्लवी शिंदे माने,मालिनी लाड, तनया पाटील यांचे लेखन सर्वोत्कृष्ट साद फाउंडेशनच्या उपक्रमाला विदेशासह- महाराष्ट्रभरातून उस्फूर्त प्रतिसाद  कणकवली/प्रतिनिधी    आपल्या संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन आहे.मात्र भेदाच्या पलीकडे ज्या गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व जाणले गेले त्याच गुरु शिष्य परंपरेची महती वाढत गेली. संगीत आणि शिक्षण क्षेत्रात तर अशा गुरु शिष्य परंपरेला मोठा वारसा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साद फाउंडेशनने आयोजित केलेली ही गुरु शिष्य प्रेम पत्र लेखन स्पर्धा फार महत्त्वाची असून याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद थक्क करणारा होता असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांनी येथे केले.      ' साद फाउंडेशन सिंधुदुर्ग' ने आयोजित केलेल्या खुल्या गुरु शिष्य प्रेम पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कवी अजय कांडर आणि कवयित्री संध्या तांबे यांच्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव होणार साजरा. विविध कार्यक्रमांचे आयोजन सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ याची होणार पारंपरिक फुगडी. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे  यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त  शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ यांच्यावतीने पारंपरिक फुगडी कार्यक्रम रात्री ८ वा. होणार आहे.      कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ वा:- श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक आणि महाआरती , सकाळी १० वा:- भगव्या ध्वजाचे पूजन सकाळी १०.३० वा:- ढोल वादन, दुपारी १२ वा:- सुस्वर स्थानिक भजने, दुपारी ३ वा:- महिलांसाठी हळदीकुंकू सायंकाळी ६ वा:- स्थानिक पालकांचे सत्कार , रात्री ८ वा:- पारंपरिक फुगडी कार्यक्रम  सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळे आम्ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश 'आवानओल ' काव्यसंग्रहातील 'झडत गेलेल्या  झाडाविषयीची गोष्ट' कवितेचा गौरव कणकवली/प्रतिनिधी      कवी अजय कांडर यांच्या 'आवानओल ' या बहुचर्चित काव्यसंग्रहातील 'झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट ' या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी विविध विद्यापीठांच्या अकरा अभ्यासक्रमांमध्ये आणि आणि एका शालेय अभ्यासक्रम कवी अजय कांडर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.     कवी अजय कांडर हे 90 नंतरच्या पिढीतील मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. 'आवानओल, हत्ती इलो,युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी ' हे त्यांचे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध असून आवानओल हा काव्यसंग्रह 2005 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर गेल्या वीस वर्षात वेगवेगळ्या कारणाने मराठी कवितेच्या केंद्रस्थानी चर्चिला जात आहे. यापूर्वी या संग्रहातील अनेक कवितांचा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला.त्यातही या संग्रहातील 'बाया पाण्याशीच बोलतात ...

सिंधुदुर्ग today

इमेज
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर कणकवली : राज्याचे  मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे -  सकाळी १०.४५ वा. मुंबई येथून मोटारीने जुहू विमानतळाकडे प्रयाण,  सकाळी ११.०० वा. पवनहंस, जुहू विमानतळावरून हेलिकॉप्टरने (VT-DBH) देवगडकडे प्रयाण,  दुपारी १२.१५ वा. एस. एच. केळकर कॉलेज, देवगड येथे हेलिकॉप्टरने आगमन, दुपारी १२.३० वा. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे (दक्षिण काशी) यात्रा निमित्त दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, दुपारी १.३० वा. मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण,  दुपारी २.०० वा. एस. एच. केळकर कॉलेज येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, दुपारी ३.१५ वा. पवनहंस, जुहू विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने अधिश निवासस्थान येथे प्रस्थान केले जाईल, असा दौरा संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य - पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा  दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार ; सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार अवैध धंद्यांना आळा घालणार सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (ऋषिकेश मोरजकर):  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकारी  निर्णय घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात असून, मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही विभागाने निधी अखर्चित ठेवू नये, अन्यथा पुढील वर्षी अतिरिक्त निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपवनसंरक्षक श्री....

सिंधुदुर्ग today

इमेज
  कवी विठ्ठल कदम यांना कवी नारायण सुर्वे पुरस्कार  नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवी मुंबईच्या संस्थेतर्फे कदम यांचा गौरव. सावंतवाडी/प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे घेऊन जाण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अग्रगण्य कार्यकर्ते आणि प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम यांना कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देण्यात येणारा कवी नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी मुंबई येथील साहित्य रसिक संस्थेतर्फे कवी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय काव्य पुरस्कार योजना आयोजित करण्यात आली होती. यात कवी कदम यांच्या 'फाळ ' या कवितेला नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दीड हजार रुपये ,स्मृतीचिन्ह , मानपत्र आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या या पुरस्कारासाठी पुरस्कार योजनेचे परीक्षक मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ. दामोदर मोरे यांनी कदम यांच्या 'फाळ ' या कवितेची सर्वोत्कृष्ट कविता म्हणून निवड केली.       कविवर्य नारायण सुर्वे हे सिंधुदुर्गचे सुपुत्र. वैभववाडी तालुक्यातील हेत हे त्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद निवडणुकीत संतोष पारकर विजयी  संतोष पारकर यांना ३२७० मिळाले मताधिक्य. कणकवली दि.९ फेब्रुवारी :  कासार्डे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांचा ४९९५ मते मिळाली आहेत.तर उबाठा पक्षाचे उमेदवार राजा म्हसकर यांना १७२५ मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांचा  ३२७० मताधिक्यांनी विजय झाला आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील स्वामी समर्थ मठामध्ये १४ फेब्रुवारी रोजी पादुका पालखी सोहळा.  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मधली वाडी येथे श्री अक्कलकोट स्वामी महाराज चरण पादुका पालखी सोहळा शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.          या निमित्ताने सकाळी १० ते ४ पर्यंत दर्शनासाठी तसेच आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रींच्या दर्शनासाठी इच्छा असूनही ज्या भक्तांना स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे जाता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामींची पादूका पालखी आपल्या गावी येत आहे.तरी सर्व भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दरम्यान आज विवाह बंधनात अडकलेला भूषण संतोष पारकर यांनी आज सायंकाळी 5.15 च्या सुमारास नांदगाव केंद्र शाळा नंबर येथील  मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय तसेच माजी उपसरपंच निरज मोरये, राजेंद्र मोरजकर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश. काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर. मुंबई  प्रतिनिधी  राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोकणासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काजू लागवड केली जाते. सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर काजू लागवड असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला या उद्योगाचा मोठा आधार आहे. मात्र उत्पादनवाढ, प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण, बाजारपेठ विस्तार व निर्यात वाढ यासाठी स्वतंत्र धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करत काजू मंडळाच्या कार्यक्षेत्रात लागवड वाढ, उत्पादकता वृद्धी, संशोधन, प्रक्रिया उद्योगांना चालना, ब्रँडिंग व मार्केटिंग सक्षमीकरण य...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्गनगरी दिनांक 06 (ऋषिकेश मोरजकर) जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सावंतवाडी येथील मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना करण्याबाबत आढावा घेतला. तसेच सखी मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, धवडकी व आदर्श मतदान केंद्र, जिल्हा परिषद शाळा, माझगाव येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी समीर घारे व सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील सखी मतदान केंद्र, झरे १ येथेही भेट देऊन व्यवस्थेची तपासणी केली. महिला मतदारांसाठी सुरक्षित व सुलभ वातावरण...

सिंधुदुर्ग today

इमेज
  विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा! ; साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली/प्रतिनिधी        शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन यादगार झाले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कवीनी आपल्या कविता सादर करताना निसर्ग, सामाजिक जाणीव, राजकीय कोंडी अशा विषयावर आपल्या कवितांमधून भाष्य करून आपले मन मोकळे केलेच परंतु विद्रोहाच्या तीव्र आवाजावर उतारा म्हणून प्रेमाचे काही किस्से ऐकून उपस्थित रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले. वय झाल तरी 'प्रेमाने वेणीत गजरा माळायला अजून पर्यंत कोणी मिळालाच नाही' अशी कविता सादर  करून कवयित्री दर्शना पाताडे यांनी मुलीला मुलगा मिळत नाही आणि मुलाला मुलगीही मिळत नाही ही आजची विवाहाची समस्याच आपल्या कवितेतून प्रकट केली!         राजापूर, दोडामार्ग, बांदा, वैभववाडी, मालवण, देवगड अशा दूर दूरच्या भागातून सुमारे 50 कवी या कवी संमेलना सहभागी झाले होते. आपल्या कवितातून वेगवेगळ्या आपल्या भावना प्रगट करताना कवी...

सिंधुदुर्ग today

इमेज
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये युतीच्या उमेदवारांची निवडणुकीवर एकतर्फी पकड फोंडाघाट विभागात युतीच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी फोंडाघाट /संजय सावंत        फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील शिंदे शिवसेना व भाजप महायुतीच्या तीनही उमेदवारांना मतदार संघातील जनतेकडून भरघोस प्रतिसाद लाभत असून मतदार संघातील फोंडा घाट लोरे वाघेरी पियाळी नवीन कुर्ली वसाहत आधी सर्व भागांमध्ये या युतीच्या प्रचारामध्ये आघाडी दिसत असल्याने युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.      फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार सदानंद उर्फ बबन हळदीवे हे धनुष्यबाण या चिन्हावर लढत असून त्यांनी आजपर्यंत लढविलेल्या जवळपास 17 ते 18 निवडणुकांमध्ये कधीही हार पत्करलेली नाही त्यामुळे त्यांचा असलेला जनसंपर्क त्याचबरोबर त्यांची जनतेची काम करण्याची तळमळ त्यामुळे ते तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले शिंदे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आंग्रे यांचाही ह्या विभागात मोठा दरारा असून त्यांनी या विभागातील जनतेची केलेली लाखो करोड रुपय...

सिंधुदुर्ग today

इमेज
  सेवानिवृत्त शिक्षिका सौ.समीधा महाडिक यांचे निधन  सेवानिवृत्त नायब तहसीलदार दीपक महाडिक यांना पत्नीशोक कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील मूळ नांदगाव तिठा येथील रहिवासी असलेले तसेच आता कलमठ कणकवली येथे वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.समिधा दीपक महाडिक यांचे काल सायंकाळी निधन झाले आहे. त्या ६६ वर्षांच्या होत्या. सेवानिवृत्त देवगड नायब तहसीलदार दीपक महाडिक यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पश्चात पती एक मुलगा तसेच दिर जावा पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज सिंधुदुर्गनगरी, दि. ०४ (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्षात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 115 तर पंचायत समितीसाठी 244 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.  तर निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही यासाठी गस्त वाढविणे, प्रतिबंधात्मक कारवाई, तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल...

सिंधुदुर्ग today

इमेज
उबाठा सेनेला कोळोशी गावात अजून एक धक्का! कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे यांच्यासह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश! नाम. नितेश राणे यांनी केले स्वागत !  कणकवली : तालुक्यातील कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष इंदप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने कोळोशी परिसरात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले, असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी नाम. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रवेश करताना सांगितले की, भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ध्येय - धोरणांवर विश्वास ठेवून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा आमचा निर्धार आहे. आमच्याकडून जि काही मदत लागेल ती नक्कीच आम्ही करू. भारतीय जनता पा...

सिंधुदुर्ग today

इमेज
बावशी उबाठा सेना ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते स्वागत कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेला मोठा धक्का बसत असून तोंडवली बावशी येथे उबाठा सेनेचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. तोंडवली बावशी येथील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तसेच अनेक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री तथा भाजप नेते नामदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनश्री हेमंत कांडर (ग्रामपंचायत सदस्य, तोंडवली बावशी), हेमंत सुरेश कांडर (तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष), मोहण बाळकृष्ण खडपे, जनार्दन बाळकृष्ण खडपे, सविता खडपे, दिगंबर सुरेश कांडर, करण भार्गव कांडर, तात्या तेली, संतोष तेली, लक्ष्मण तेली, संगिता तेली, वासुदेव तेली, राजेंद्र कांडर, नामदेव कांडर व उद्धव कांडर बुवा यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
वागदे घरफोडी चोरीप्रकरणी संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ  मर्गज यांचा यशस्वी युक्तिवाद    कणकवली / प्रतिनिधी   वागदे घरफोडी चोरीप्रकरणी संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली असून ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ मर्गज यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला.    सविस्तर हकिगत अशी की कणकवली येथील कणकवली श्रीकृष्ण उर्फ आर्यन निलेश ठाकूर( वय १९ वर्षे,हळवल), गौरेश राजेंद्र घाडीगावकर( वय २१ वर्षे,वागदे) यांना अटक करून मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचे समोर हजर केले. आरोपी तर्फे दिलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व आरोपी यास रु.५०,०००/- च्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांनी दिले. आरोपीच्यावतीने अँड. प्राजक्ता म.शिंदे व अँड.कौस्तुभ मर्गज  यांनी काम पाहिले. फिर्यादी अंकिता शिवाजी घाडीगावकर, र (वागदे) यांनी दिलेली फिर्याद अशी की, त्यांच्या राहते घरातील सुमारे २.५ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या २ कुड्या,  सुमारे २.५ ग्रॅम वजनाची एक सोन्याच...

सिंधुदुर्ग today

इमेज
भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी प्रतिनिधी :         भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. नामदार नितेश राणे यांनी श्री मोरे यांचे पक्षात स्वागत केले आहे. या निवडणुकीत उबाठाला बसलेला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी  सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिनविरोध चा फार्मूला अमलात आणला.यात कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात फार मोठे यश आले.आठ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध झाले. तर १७ पंचायत समिती सदस्य बिनविरोध केल्या. याचा प्रभाव आजही निवडणुकांवर कायम आहे. भुईबावडा पंचायत समितीत उबाठा  पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असलेले वसं...

सिंधुदुर्ग today

इमेज
संतोष म्हाडेश्वर यांच्या वतीने नांदगाव केंद्र शाळा नं. १ येथे खेळाचे ड्रेस व इतर साहित्याचे वितरण  कणकवली प्रतिनिधी  संतोष म्हाडेश्वर यांच्या वतीने आज नांदगाव केंद्र शाळा नं. १ येथे खेळाचे ड्रेस व इतर साहित्याचे वितरण करण्यात आले.         प्रीतगंध फाउंडेशन मुंबई,अध्यक्ष संतोष म्हाडेश्वर यांचे मुळगाव  तिवरे यानी आज कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा नांदगाव नं.१ प्रशालेच्या बारा विद्यार्थ्यांसाठी खेळाचे ड्रेस, सर्व विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स आणि बिस्कीट पुडे भेट दिले.  त्यांच्यासोबत शिवानी म्हाडेश्वर फाउंडेशनच्या खजिनदार, तसेच सह्याद्री कन्या सन्मा. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे आदी उपस्थित होत्या. बहुमोल दातृत्वाबद्दल केंद्र शाळा नांदगाव नं. १ च्या वतीने केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद देत शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात होणार दुरंगी लढत  महायुतीचे संतोष पारकर विरुद्ध उबाठा सेनेचे राजा म्हसकर यांच्यात होणार दुरंगी लढत  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार संतोष पारकर विरुद्ध उबाठा सेनेचे उमेदवार नांदगाव शाखा प्रमुख असलेले हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळत आहे.      नांदगाव पंचायत समिती मधून हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर  कासार्डे पंचायत समितीमध्ये भाजप महायुतीचे सहदेव उर्फ अण्णा खाडये तर उबाठा सेनेचे मयुर पेडणेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.      कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे,कोळोशी, आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ आहे. या जिल्हा परिषद मतदार संघात जवळपास ८ हजार मतदार आहेत.      मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यावेळी काँग्रेस कडून संजय देसाई तर...

सिंधुदुर्ग today

इमेज
अजय कांडर यांचा साहित्य चळवळ योगदानासाठी अक्षरमित्र पुरस्काराने गौरव पद्मश्री कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण कणकवली/प्रतिनिधी       कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35 वर्षातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना राजापूर लांजा नागरिक संघामुंबईतर्फे देण्यात येणारा 2026 चा अक्षरमित्र पुरस्कार लांजा रिंगणे ज्येष्ठ संपादक माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलना प्रदान करण्यात आला. विख्यात व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर आणि नामवंत चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराने कांडर यांना गौरविण्यात आले.यावेळी साहित्य कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.       लांजा- रिंगणे येथे पद्मश्री केतकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवशीय राजापूर लांजा नागरिक संघाचे अकराव्या ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी कवी कांडर यांना त्यांची गेल्या 35 वर्षातील साहित्य चळवळीची वाटचाल लक्षात घेऊन अक्षरमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी अज...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा "धमाका" उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश  कणकवली हरकूळ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश  सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर 'मशाल' सोडून 'कमळ' हाती घेतले आहे. रविवारी कणकवलीतील हरकुळ बु. येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांंच्यासमवेत शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. जिल्हा  परिषद निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेसाठी सतीश सावंत यांच्या रूपाने हा मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ झाली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,दिलीप तळेकर,मनोज रावराणे, बबलू सावंत ...