सिंधुदुर्ग today
विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा! ; साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले
राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग
कणकवली/प्रतिनिधी
शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन यादगार झाले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कवीनी आपल्या कविता सादर करताना निसर्ग, सामाजिक जाणीव, राजकीय कोंडी अशा विषयावर आपल्या कवितांमधून भाष्य करून आपले मन मोकळे केलेच परंतु विद्रोहाच्या तीव्र आवाजावर उतारा म्हणून प्रेमाचे काही किस्से ऐकून उपस्थित रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले. वय झाल तरी 'प्रेमाने वेणीत गजरा माळायला अजून पर्यंत कोणी मिळालाच नाही' अशी कविता सादर करून कवयित्री दर्शना पाताडे यांनी मुलीला मुलगा मिळत नाही आणि मुलाला मुलगीही मिळत नाही ही आजची विवाहाची समस्याच आपल्या कवितेतून प्रकट केली!
राजापूर, दोडामार्ग, बांदा, वैभववाडी, मालवण, देवगड अशा दूर दूरच्या भागातून सुमारे 50 कवी या कवी संमेलना सहभागी झाले होते. आपल्या कवितातून वेगवेगळ्या आपल्या भावना प्रगट करताना कवीनी आपल्यातील माणुसकीचे ही दर्शन घडविले. कवयित्री निशिगंधा गावकर यांनी याबाबत आपल्या कवितेतून भाष्य करताना 'माणुसकीचे जपून नाते माणूस आत जपावा,आणि सर्वांना आनंद देत आनंदही घ्यावा' असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थितानीही टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
अनेक कवीनी आपल्या मालवणी कविता सादर करून आपल्या बोली भाषेचा गोडवा जपला. यात बांदा येथील कवी हरिचंद्र भिसे आणि दोडामार्ग येथील कवी रामचंद्र शिरोडकर यांच्या मालवणी कवितेला उस्फूर्त दाद मिळाली. कवी संमेलनाचा प्रारंभ बांदा येथील आठवीत शिकणारा नैतिक मोरजकर याच्या कवितेने झाली. त्याने रानटी हत्तीला कसा त्रास दिला जातो याचे वर्णन करताना उपस्थितांना अंतर्मुख केले. यानंतर सत्यवान साटम यांनी आपली कविता सादर करून तसाच प्रतिसाद मिळविला. सुधीर गोठणकर यांनी उत्तम प्रकारे कविता गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर अमर पवार यांच्या मालवणी कवितेने सभागृहात हास्य पसरवले.
मंगेश आरेकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कवी संमेलनात भालचंद्र सुपेकर, संचिता चव्हाण, संगीता पाटील, विद्या पाटील , नंदिनी रावराणे ,सायली नारकर, सागर कदम, हर्षल तांबे, संजय तांबे, सिद्धेश खटावकर, किशोर कदम, मधुकर मातोंडकर, पल्लवी शिरगावकर , समीक्षा चव्हाण,शर्मिला केळुसकर, संदीप कदम, आर्या कदम, के एस वरदेकर, प्रगती पाताडे ,स्वराज चव्हाण,मालिनी लाड, निलेश जाधव, वैष्णवी सुतार आधी कवीने आपल्या कविता सादर केल्या.
यावेळी बोलताना कवी संमेलन अध्यक्ष संध्या तांबे म्हणाल्या साहित्य संमेलने सातत्याने होत असतात परंतु डॉ. निर्मोही फडके यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य आणि संगीत संमेलन आयोजित करून अनेक कला एकमेकाला पूरक असतात हे या संमेलनाचे आयोजक कवी अजय कांडर, स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दाखवून दिले. आताच्या काळात खूप विपुल कविता लिहिली जात आहे परंतु चांगला कवी अपवादानेच मिळत असतो. अशा चांगल्या लेखनासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल. हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जावे. आपले सर्वतोपरि सहकार्य संमेलनाला मिळेल. सातत्याने असे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तेव्हा समाजात काही चांगले बदल घडत असतात.साहित्य आणि संगीत बदलाचा विचार करताना अशा संमेलनाची नितांत गरज आहे.

कणकवलीतील साहित्य संगीत संमेलन हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाचे एक उदाहरण म्हणता येईल.
उत्तर द्याहटवात्यातील शेवटच्या सत्रातील कविसंमेलन हेही 'यादगार' असे होते. समाजात कवी आहेत, म्हणून समाज भावनिक आणि वैचारिक दृष्टीने अजून जिवंत आहे, ह्याचे प्रत्यंतर देणाऱ्या कविता इथे सादर झाल्या. कवी हो! कविता करत आणि कविता जगत राहू या. आयोजकांचे खास अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!