सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव होणार साजरा.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ याची होणार पारंपरिक फुगडी.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ यांच्यावतीने पारंपरिक फुगडी कार्यक्रम रात्री ८ वा. होणार आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ वा:- श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक आणि महाआरती , सकाळी १० वा:- भगव्या ध्वजाचे पूजन सकाळी १०.३० वा:- ढोल वादन, दुपारी १२ वा:- सुस्वर स्थानिक भजने, दुपारी ३ वा:- महिलांसाठी हळदीकुंकू सायंकाळी ६ वा:- स्थानिक पालकांचे सत्कार , रात्री ८ वा:- पारंपरिक फुगडी कार्यक्रम सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा