सिंधुदुर्ग today



फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये युतीच्या उमेदवारांची निवडणुकीवर एकतर्फी पकड

फोंडाघाट विभागात युतीच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी

फोंडाघाट /संजय सावंत 

      फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील शिंदे शिवसेना व भाजप महायुतीच्या तीनही उमेदवारांना मतदार संघातील जनतेकडून भरघोस प्रतिसाद लाभत असून मतदार संघातील फोंडा घाट लोरे वाघेरी पियाळी नवीन कुर्ली वसाहत आधी सर्व भागांमध्ये या युतीच्या प्रचारामध्ये आघाडी दिसत असल्याने युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

    फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार सदानंद उर्फ बबन हळदीवे हे धनुष्यबाण या चिन्हावर लढत असून त्यांनी आजपर्यंत लढविलेल्या जवळपास 17 ते 18 निवडणुकांमध्ये कधीही हार पत्करलेली नाही त्यामुळे त्यांचा असलेला जनसंपर्क त्याचबरोबर त्यांची जनतेची काम करण्याची तळमळ त्यामुळे ते तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले शिंदे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आंग्रे यांचाही ह्या विभागात मोठा दरारा असून त्यांनी या विभागातील जनतेची केलेली लाखो करोड रुपयांची कामे यामुळे या फोंडा विभागातील जनता संजय आंग्रे यांचा शब्द खाली पडू देत नाही त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांचीही तळागाळातील जनतेपर्यंत असलेली पोहोच या त्रिसूत्रीच्या जोरावर फोंडा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सदानंद उर्फ बबन हळदिवे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

      तर फोंडाघाट पंचायत समिती करिता उभे असलेले पवन भालेकर हे सध्याचे ग्रामपंचायत सदस्य असून त्या माध्यमातून आपल्या बहुतांशी ग्रामपंचायत वार्ड मध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि फोंडाघाट पंचायत समिती विभागातील नागरिकांना शाश्वत विकास करून दाखवण्याचा दृष्टिकोन घेऊन जनतेसमोर जात असल्याने त्यांनाही फोंडाळ पंचायत समिती विभागातील जनतेकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे मात्र या पंचायत समिती विभागांमध्ये पाच उमेदवार लढत देत असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित मानले जात आहे.

       तसेच लोरे पंचायत समिती करिता युतीकडून मानसी मिलिंद मराठे या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असून तेथील निवडणूक ही जवळपास एकतर्फी मानली जात आहे कारण लोरा घोणसरी वाघेरे पियाळी या भागांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून माजी सभापती मनोजराव राणे यांनी केलेली विकास कामे ही जनतेसमोर असल्याने लोरा पंचायत समिती निवडणूक मानसी मराठे यांना सोपी जाणार असे चित्र आज समोर दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today