सिंधुदुर्ग today



कवी अजय कांडर यांचे 'माझं जगणं माझी भाषा' विषयावर  २७ रोजी रत्नागिरी येथे व्याख्यान

कणकवली/प्रतिनिधी

       मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भाषादिन कार्यक्रमात कवी अजय कांडर यांचे माझं जगणं माझी भाषा या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर विषयावरील कवी कांडर यांचे व्याख्यान जळगाव बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह महाराष्ट्राच्या विविध भागात यापूर्वीही आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे कांडर यांना सदर व्याख्यानासाठी मराठी भाषा दिनानिमित्त रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

     कवी अजय कांडर हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, अभ्यासू स्तंभ लेखक आणि व्याख्याते म्हणून सर्वत्र परिचित आहेत. युगानुयुगे तूच ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कविता आणि  महात्मा गांधी यांच्यावरील अजूनही जिवंत आहे गांधी या दोन्ही कविता त्यांच्या बहुचर्चित आहेत. या दोन कवितेच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारावर त्यांची विशेष व्याख्याने सातत्याने होत असतात. गेल्या वर्षी १४ एप्रिलच्या निमित्ताने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी शाहू स्मारक मध्ये डॉ.बाबासाहेबांवरती कांडर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तर आपलं जगणं आपली भाषा या विषयावर जळगाव बेळगाव यासह महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांची व्याख्यानेही आयोजित केली गेली आहेत. विषयाची मुद्देसूद मांडणी, सामान्य श्रोत्यांपासून अभ्यासू वर्गापर्यंत समजेल अशा सोप्या भाषेत रसाळ वाणीने विषय कथन करणे यासाठी कवी कांडर हे व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today