सिंधुदुर्ग today
पेन्शनर असोसिएशन सभेत विविध विषयावर चर्चा
कणकवली/प्रतिनिधी
येथील पेन्शन असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पेन्शनर असोसिएशन सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि काही ठोस निर्णय घेण्यात आले.
सदर सभेत पुढील प्रमाणे महत्त्वाचे ठराव व निर्णय घेण्यात आले. पेनशर भवनची मासिक सभा दरमहाचे दहा तारीख ऐवजी दरमहाच्या 5 तारीखला सकाळी 10.30 वा.घेण्यात येईल.पेन्शनर भवनकडे जाणारी पायवाट आहे, ती ग्रामपंचायत कलमठने तेथे पायऱ्या व रॅम्प बांधून देण्याचे काम मंजूर केले.त्यासाठी रु.60000 निधी उपलब्ध होताच काम सुरू करुन पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायत अधिकारी व संरपच यांनी दिले. त्याची माहिती सभेत देण्यात आली. याबाबत अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.गुरु शिष्य प्रेम पत्र स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झाल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी सुगंधा देवरुखकर यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. त्याच बरोबर सुगंधा देवरुखकर यांनी 1 लाख रक्कमेची फिक्स डिपॉझिट करून त्याच येणारे तिमाही व्याज 2686 रुपये पेन्शनर संघटनेच्या कामकाजासाठी व त्यांच्या पश्चात 1 लाख पेन्शनर संघटनेला दान केले असल्याची माहिती सभेत देण्यात आली व तसे लेखी पत्रही देवरुखकर यांनी संघटनेला दिले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.त्याच बरोबर देवरुखकर यांनी अवयव दान व नेत्रदान करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेतल्याचीही माहिती येथे देण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव व्ही.के.चव्हाण, सहा. सेक्रेटरी सुगंधा देवरुखकर, उपाध्यक्ष गोविंद साळकर, सललागार पूजा सावंत,कबीर भोजे,मोहन सावंत,प्रा.हरीभाऊ भिसे सदस्य,रिमा भोसले, सदस्य, श्री.पाटकर,श्री.लिमये, गौरी साळकर, उलका जोशी, दळवी, कदम,सुरेखा महाजन आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा