सिंधुदुर्ग today
कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात होणार दुरंगी लढत
महायुतीचे संतोष पारकर विरुद्ध उबाठा सेनेचे राजा म्हसकर यांच्यात होणार दुरंगी लढत
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार संतोष पारकर विरुद्ध उबाठा सेनेचे उमेदवार नांदगाव शाखा प्रमुख असलेले हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळत आहे.
नांदगाव पंचायत समिती मधून हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर कासार्डे पंचायत समितीमध्ये भाजप महायुतीचे सहदेव उर्फ अण्णा खाडये तर उबाठा सेनेचे मयुर पेडणेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे,कोळोशी, आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ आहे. या जिल्हा परिषद मतदार संघात जवळपास ८ हजार मतदार आहेत.
मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यावेळी काँग्रेस कडून संजय देसाई तर भाजपा सेना युती कडून संजय पाताडे अशी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीत संजय देसाई विजयी झाले होते.
२०१७ ची आकडेवारी काय
२०१७ साली एकूण ७२७९ मतदान झाले होते. यातील संजय देसाई यांना ४२६२ तर संजय पाताडे यांना २७३४ तर मनसे दत्ताराम बिडवाडकर यांना १५५ नोटा १२८ अशी २०१७ साली झालेल्या निवडणुकीची आकडेवारी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा