सिंधुदुर्ग today

 


नांदगाव उर्दू शाळेचा  वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

कणकवली प्रतिनिधी
  नांदगाव उर्दू शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी नांदगाव गावाचे सरपंच रविराज मोरजकर , नांदगाव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके , कार्यक्रमाचे अध्यक्ष  अहमद बटवाले, उपसरपंच  इरफान साठविलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  यासीन बटवाले, उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष  सईद बटवाले,ग्रामपंचायत सदस्य  रमीजान बटवाले, तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे , पोलीस पाटील वृषाली मोरजकर, उपाध्यक्ष  रजिया सारवण,  अब्दुल रजाक बटवाले, अब्दुल मजीद बटवाले, बाळा मोरये, फिरोज साठविलकर,  मुख्याध्यापक श्री. मुस्ताक कितुर आदी मान्यवर उपस्थित होते.
         कार्यक्रमाची सुरुवात किरात व हमद पठणाने करण्यात आली. मान्यवरांचे यथोचित सन्मान करून शिष्यवृत्ती परीक्षा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, अबॅकस मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेतील यश व बॅडमिंटन आणि कॅरम स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांच्या विशेष कौतुक करून मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री यासीन बटवाले यांनी आपल्या मनोगत या सर्व विद्यार्थी , पालक व शिक्षकांचे विशेष कौतुक केले तसेच गावातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्याकरिता उत्तम वातावरण निर्मितीसाठी सरपंचांचे लक्ष वेधले.
सरपंच श्री रविराज मोरजकर यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या . शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन समिती यांच्या कामांची प्रशंसा केली तसेच  हर्षदा वाळके  यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या शाळेत विशेष प्रयत्न केले जात असल्यामुळे आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सईद बटवाले तर आभार  अन्वर खान सर यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today