सिंधुदुर्ग today


वागदे घरफोडी चोरीप्रकरणी संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता

ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ  मर्गज यांचा यशस्वी युक्तिवाद 

  कणकवली / प्रतिनिधी

  वागदे घरफोडी चोरीप्रकरणी संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली असून ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ मर्गज यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला.

   सविस्तर हकिगत अशी की कणकवली येथील कणकवली श्रीकृष्ण उर्फ आर्यन निलेश ठाकूर( वय १९ वर्षे,हळवल), गौरेश राजेंद्र घाडीगावकर( वय २१ वर्षे,वागदे) यांना अटक करून मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचे समोर हजर केले. आरोपी तर्फे दिलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व आरोपी यास रु.५०,०००/- च्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांनी दिले. आरोपीच्यावतीने अँड. प्राजक्ता म.शिंदे व अँड.कौस्तुभ मर्गज  यांनी काम पाहिले. फिर्यादी अंकिता शिवाजी घाडीगावकर, र (वागदे) यांनी दिलेली फिर्याद अशी की, त्यांच्या राहते घरातील सुमारे २.५ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या २ कुड्या,  सुमारे २.५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, सुमारे १ ग्रॅम वजनाची  गळ्यातील सोन्याची डौली, सोन्याची नथ, रक्कम रु.१,८००/- हा किमती माल कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप चावीने खोलून घरामध्ये प्रवेश करुन खोलीतील लोखंडी कपाटातील लॉकर कशानेतरी उचकटून लॉकर व त्याखालील ड्रॉवरमध्ये ठेवलेले वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी नेले.त्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.गुन्ह्यातील संशयित आरोपी श्रीकृष्ण उर्फ आर्यन निलेश ठाकुर याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला 

रिमांडकामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक ३०जानेवारी २०२६ पर्यत आरोपी याची पोलीस कोठडी मंजूर केली.

दरम्यान त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरची चोरी घरफोडी ही त्याचा साथीदार गौरेश राजेंद्र घाडीगावकर याच्या सोबत मिळून केली असल्याचे कथन केले. त्यामुळे संशियत गौरेश राजेंद्र घाडीगावकर याचा शोध घेवून त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला.नंतर दोन्ही संशयित आरोपी यांना कणकवली प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याचे आदेश कोर्टाने पारित केले.तद्नंतर संशयित आरोपी क्र.१ व २ यांचेकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सदर जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी अंती मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांनी आरोपी क्र.१ व २ यांची रु.५०,०००/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. दोन्ही संशयित आरोपींच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ मर्गज यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today