सिंधुदुर्ग today

 


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज

सिंधुदुर्गनगरी, दि. ०४ (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्षात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 115 तर पंचायत समितीसाठी 244 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.  तर निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही यासाठी गस्त वाढविणे, प्रतिबंधात्मक कारवाई, तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार 5 लाख 61 हजार 105 एवढे आहेत. यामध्ये 2 लाख 82 हजार 588 स्त्री मतदार तर 2 लाख 78 हजार 516 पुरूष मतदार आहेत. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

निवडणूकीची वैशिष्‍टये

मतदाराची ओळख पटविण्‍यासाठी पक्‍कया न मिटणा-या शाईचा वापर केला जाणार. 

आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यान्वित 

mahasecvotelist.in  अॅपचा मतदारांची नावे शोधणेसाठी वापर करता येईल. 

गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन matadhikar अॅप डाऊनलोड करुन मतदारांची माहिती प्राप्‍त करता येणार 

मतदाना सुरु होण्‍याआधी २४ तास प्रचाराची मुदत संपणार. 

जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणन समिती गठीत तसेच निवडणूक सनियंत्रण समिती स्‍थापना

  खर्च नियंत्रण समिती गठीत, कॅश रिलीज कमिटी गठीत  

*एकूण मतदान केंद्रांची संख्‍या -* ८७०  पैकी ८१० मतदान केंद्रावर मतदान होणार 

*मतदार यादी*

राज्‍य निवडणूक आयोगाकडील mahasecvoterlist.in  अॅपचा वापर करुन मतदार यादीतील नावे शोधता येतील.

• दिनांक ०१/०७/२०२५ रोजीची अधिप्रमाणीत मतदार यादीचा वापर करणेत येणार 

• दुबार मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार, मा. राज्‍य निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१०/२०२५ चे आदेशान्‍वये कार्यवाही केली जाणार. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today